indurikar maharaj: ..हे कटू सत्य, इंदूरीकर महाराजांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 01:15 PM2022-07-18T13:15:42+5:302022-07-18T13:17:00+5:30

कोरोनामुळे मुले शाळेत न जाता ऑनलाइन पास झाली.

this bitter truth, Indurikar Maharaj expressed his opinion | indurikar maharaj: ..हे कटू सत्य, इंदूरीकर महाराजांनी व्यक्त केलं मत

indurikar maharaj: ..हे कटू सत्य, इंदूरीकर महाराजांनी व्यक्त केलं मत

Next

रेठरेधरण : कोरोना काळात सर्व कार्यक्रम बंद असताना, निवांत असल्याने गावी शेतात जाऊन शेतीची कामे केली. त्यावेळी शेती परवडत नसल्याचे लक्षात आले. हे कटू सत्य आहे, असे मत इंदूरीकर महाराज यांनी व्यक्त केले. रेठरेधरण (ता. वाळवा) येथे आनंदराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तन कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले.

इंदूरीकर महाराज म्हणाले, कोरोनामुळे मुले शाळेत न जाता ऑनलाइन पास झाली. मुले व युवक मोबाईलचा अतिवापर करत आहेत. त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर परिणाम होत आहे. युवकांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे.

ते म्हणाले, आनंदराव पाटील यांनी गाव व परिसरासाठी मोठी विकासकामे केली. त्यांचे भाऊ दादासाहेब पाटील, प्रतीक पाटील व हर्षवर्धन आनंदराव पाटील यांनी यापुढे रेठरेधरण गावात संपूर्णपणे सौरऊर्जेचा वापर करून विजेचा वापर टाळावा. गावात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी, असा सल्ला दिला.

यावेळी आनंदराव पाटील यांचा जीवनपट पडद्यावर दाखविण्यात आला. हर्षवर्धन पाटील यांनी इंदूरीकर महाराज यांचा सत्कार केला. यावेळी देवराज पाटील, रणजित पाटील, शिवाजीराव साळुंखे, संजय पाटील, विजय पाटील, विराज शिंदे, नेताजी पाटील आदी उपस्थित होते. विजय मुळीक यांनी आभार मानले.

Web Title: this bitter truth, Indurikar Maharaj expressed his opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.