अवैधरीत्या प्राणी बाळगणाऱ्या प्राणी मित्राची कसून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:18 AM2021-06-19T04:18:50+5:302021-06-19T04:18:50+5:30
कुपवाड : वन्यपक्षी व प्राणी अवैधरीत्या घरात बाळगल्याप्रकरणी अशोक लकडे या प्राणी मित्राची वनविभागाने कसून चौकशी सुरू केली आहे. ...
कुपवाड : वन्यपक्षी व प्राणी अवैधरीत्या घरात बाळगल्याप्रकरणी अशोक लकडे या प्राणी मित्राची वनविभागाने कसून चौकशी सुरू केली आहे. गुरुवारी त्याच्या घरावर छापा टाकून ताब्यात घेतलेल्या ३८ वन्य पक्षी व प्राण्यांपैकी ३० पक्षी व प्राण्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. उर्वरित जखमी पक्ष्यांना उपचारासाठी पुण्यातील कात्रज उद्यानात सोडणार असल्याची माहिती सहायक उपवनसंरक्षक विजय गोसावी यांनी दिली.
सांगलीतील विजयनगरमधील लकडे या प्राणी मित्राने विविध वन्यपक्षी व प्राणी घरात का बाळगले होते, त्याच्याशिवाय यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची चौकशी अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. दुर्मीळ गरुड, घुबड, गायबगळा, कांडेकरकोचा आदी पक्षी त्याच्याकडे कुठून आले, याचीही चौकशी सुरू आहे. वन्यजीव पक्षी व प्राणी बाळगणे गुन्हा असल्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या विविध प्रकारच्या ३८ वन्य पक्षी व प्राण्यांपैकी ३० पक्षी व प्राण्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. उर्वरित जखमी अवस्थेत असलेल्या पक्ष्यांना उपचारासाठी पुणे येथील कात्रज उद्यानात सोडण्यात आले आहे.