Sangli: कुटुंबास जातीबाहेर काढून बहिष्कार टाकण्याची धमकी, पंचायत प्रमुखासह तिघांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 04:26 PM2023-12-09T16:26:48+5:302023-12-09T16:27:43+5:30

पत्नीला नांदण्यास पाठवण्यासाठी दीड लाखाची मागणी

Threatening to ostracize the family, Crime against three including panchayat chief in sangli | Sangli: कुटुंबास जातीबाहेर काढून बहिष्कार टाकण्याची धमकी, पंचायत प्रमुखासह तिघांविरुद्ध गुन्हा

Sangli: कुटुंबास जातीबाहेर काढून बहिष्कार टाकण्याची धमकी, पंचायत प्रमुखासह तिघांविरुद्ध गुन्हा

आष्टा : हातकणंगले येथील संजय संभाजी नंदीवाले (वय ३४) याला पोलिस ठाण्यातील तक्रार मागे घेऊन पत्नीला नांदवायला पाठवून देण्यासाठी एक लाख ५० हजारांची मागणी करण्यात आली. रक्कम न दिल्यास जातीबाहेर काढून कुटुंबावर बहिष्कार टाकण्याची धमकी देण्यात आल्याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. ही घटना बुधवारी, दि. ६ रोजी दुपारी बारा वाजता ढवळी येथे घडली.

याप्रकरणी जात पंचायत प्रमुख लक्ष्मण राजाराम जाधव (रा. ढवळी, ता. वाळवा), लक्ष्मण नंदीवाले (रा. दानोळी ता. शिरोळ) व पांडुरंग नंदीवाले (रा. मंगोबा मंदिर कोथळी ता. शिरोळ) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आष्टा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय नंदीवाले हे हातकणंगले येथील शाहूनगर माळभाग येथे वास्तव्यास आहेत. त्यांची पत्नी कोमल ही माहेरी असल्याने तिला आणण्यासाठी व चर्चा करण्यास जात पंचायत प्रमुख लक्ष्मण जाधव यांच्या घरी संजय नंदीवाले गेले होते. तेव्हा संजय व त्यांच्या आईवर हातकणंगले पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यासाठी व पत्नीला नांदवायला पाठवून देण्यासाठी लक्ष्मण राजाराम जाधव (रा. ढवळी, ता. वाळवा) यांनी एक लाख ५० हजारांची मागणी केली.

संजय नंदीवाले यांनी रक्कम दिली नाही तर त्यास जातीबाहेर काढून त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. याप्रकरणी संजय नंदीवाले यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जात पंचायत प्रमुख लक्ष्मण जाधव, लक्ष्मण नंदीवाले, पांडुरंग नंदीवाले यांच्यावर सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Threatening to ostracize the family, Crime against three including panchayat chief in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.