जत तालुक्यात वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:30 AM2021-04-28T04:30:09+5:302021-04-28T04:30:09+5:30
शेगाव : जत तालुक्यात सोमवारी विजांचा कडकडाट आणि वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गोंधळेवाडी, लकडेवाडी, ...
शेगाव : जत तालुक्यात सोमवारी विजांचा कडकडाट आणि वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गोंधळेवाडी, लकडेवाडी, जाडरबोबलाद येथे वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन शेतकऱ्यांचे एकूण २ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोमवारी झालेल्या विजांचा कडकडाट आणि वादळी पावसामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोंधळेवाडी येथील शेतकरी निल्लव्वा मायप्पा पांढरे यांंच्या म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला. त्यात ७० हजार रुपयांचे नुकसान झाले, तर जाडरबोबलाद येथील शेतकरी परशुराम शिवप्पा ऐनापुरे यांच्या गाईचा मृत्यू झाला. शिवाप्पा याचेे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. लकडेवाडी येथील शिवाजी सुखदेव लकडे यांच्या गाईचा मृत्यू झाल्याने ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले. जाडरबोबलादचे तलाठी विनायक बालटे, लकडेवाडीचे नितीन कुंभार, राजेश चाचे, गणेश पवार, राहुल कोळी यांनी पंचनामा केला.