सांगलीत तीन बांगलादेशी महिलांना अटक; बोगस कागदपत्रच्या आधारे बेकायदेशीर भारतात वास्तव्य
By शीतल पाटील | Published: May 22, 2023 05:51 PM2023-05-22T17:51:10+5:302023-05-22T17:51:23+5:30
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, बांगलादेशमधील महिलांना नोकरीच्या आमिषाने सांगलीत आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता.
सांगली : बनावट कागदपत्राच्या आधारावर भारतात बेकायदेशीर राहणारे तीन बांगलादेशी महिलांना सांगलीपोलिसांनीअटक केली. त्याला तीन वर्षापासून या तिन्ही महिला शहरातील गोकुळ नगर परिसरात राहत होत्या. रूपा समीर शेख (वय २३ रा. मूळ कोलकाता, सध्या संजयगांधी झोपडपट्टी), रिना कलम शेख (वय २८ सध्या रा. १०० फुटी रोड, चेतना पेट्रोल पंप जवळ) आणि नेहा सुनील यादव (वय ३२ रा. जुना कुपवाड रोड, नेहरूनगर) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. विश्रामबाग पोलिसांनी १७ फेब्रुवारी ते रविवार दि. २१ मे या कालावधीत तपास करीत महिलांवर कारवाई केली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, बांगलादेशमधील महिलांना नोकरीच्या आमिषाने सांगलीत आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. या महिलांच्या घरमालकिणींनी त्याचे बनावट आधार कार्ड बनवून घेतले होते. सुरू केला. पुण्यातील एका सामाजिक संस्थेने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पोलिसांना जाग आली. विश्रामबाग पोलिसांनी गोकुळनगरमध्ये छापा टाकून कारवाई केली असता यामध्ये बांगलादेशी तरुणींकडे बनावट आधारकार्ड असल्याचं समोर आले होते.
आधारकार्ड तयार करणाऱ्या मिरजेतील एकाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना रूपा शेख, रीना शेख आणि नेहा यादव या गेल्या तीन वर्षांपासून सांगलीत वास्तव्यास असल्याचे समोर आले होते. तिघींकडे भारतात येण्यासाठी पासपोर्ट, व्हिसासह अन्य कोणतेही वैध कागदपत्रे नसताना भारतात बेकायदेशीर अनधिकृत प्रवेश करून सांगलीत उदरनिर्वाह सुरु केला. भारतामध्ये राहण्यासाठी नागरिकत्व व रहिवाशी पुरावा म्हणून बनावट स्कुल ट्रान्सफर प्रमाणपत्र तयार करून त्याचा वापर केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. संशयित महिलांनी दाखविलेल्या कागदपत्रांवरून विश्रामबाग पोलिसांच्या पथकांनी कोलकाता येथे जाऊन चौकशी केली असता कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर या तिघींवर पासपोर्ट अधिनियम, विदेशी नागरी कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पल्लवी यादव या करत आहेत.