रेठरे हरणाक्ष येथे शेतजमिनीच्या वादातून तिघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:29+5:302021-06-02T04:21:29+5:30
इस्लामपूर : रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे शेतजमिनीच्या वादातून पाच जणांनी घरात घुसून तिघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. घरातील ...
इस्लामपूर : रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथे शेतजमिनीच्या वादातून पाच जणांनी घरात घुसून तिघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. घरातील व अंगणातील साहित्याची नासधूस केल्याची घटना घडली. हा प्रकार सोमवारी दुपारी घडला.
याबाबत यशोदा चंद्रशेखर मोरे (५२) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संग्राम शामराव मोरे, शामराव ज्योतीराव मोरे, अनुसया शामराव मोरे (सर्व रा. रेठरे हरणाक्ष), मनीषा संदीप यादव (रा. काले-कऱ्हाड) आणि राधिका सूर्यवंशी (रा. वांगी, ता. कडेगाव) अशा पाच जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या मारहाणीत यशोदा मोरे, चंद्रशेखर मोरे आणि बनुबाई मोरे असे तिघे जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास संग्राम मोरे याने घरासमोर येऊन आमच्या शेतात पाणी का सोडले, अशी विचारणा करून दमदाटी करू लागला. यशोदा मोरे यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केल्यावर संग्राम याने त्यांच्या दोन्ही हाताची बोटे पिरगाळून शिवीगाळ केली. त्यानंतर पुन्हा दोन तासांनी वरील पाच जणांनी यशोदा मोरे यांच्या घरावर हल्ला चढवित साहित्याची नासधूस करीत तिघांना मारहाण केली. हवालदार उत्तम माळी अधिक तपास करीत आहेत.