विट्यात तीन सराईत चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:33 AM2021-08-17T04:33:01+5:302021-08-17T04:33:01+5:30
विटा : केटरिंग व्यवसायाचे गोदाम फोडून ॲल्युमिनियमची भांडी, इलेक्ट्रिक केबल लंपास करणाऱ्या तीन चोरट्यांना विटा पोलिसांनी सोमवारी अटक केली. ...
विटा : केटरिंग व्यवसायाचे गोदाम फोडून ॲल्युमिनियमची भांडी, इलेक्ट्रिक केबल लंपास करणाऱ्या तीन चोरट्यांना विटा पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांंच्याकडून सुमारे एक लाख रुपये किमतीची ॲल्युमिनियमची भांडी, इलेक्ट्रिक केबल, जमखाने (पट्टी) असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी संशयित वीरू विलास जाधव (वय ३६), आशा सुभाष चव्हाण (वय ४४) व शालनबाई बाजीराव जाधव (वय ३२, सर्व रा. लक्ष्मीनगर, गोसावी वसाहत, विटा) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
विटा (यशवंतनगर) येथील संतोष टेके यांचा केटरिंग व्यवसाय आहे. दि. २६ जुलै रोजी मध्यरात्री संशयित वीरू जाधव, आशा चव्हाण व शालनबाई जाधव यांनी केटरिंग साहित्य ठेवलेल्या गोडाउनचे कुलूप तोडून त्यातील ॲल्युमिनियमची सात मोठी पातेली, सात झाकणे, ताट, वाट्या, बेडशिट, इलेक्ट्रिक केबल असा सुमारे एक लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी दि. १३ ऑगस्ट रोजी विटा पोलिसात संतोष टेके यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली होती.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सोमवारी सकाळी संशयित चोरटे मायणी रोडवरील एका भंगार दुकानात साहित्य विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र भिंगारदेवे, हणमंत लोहार, अमरसिंह सूर्यवंशी, शशिकांत माळी, सुरेश भोसले, रोहित पाटील, बाबासाहेब खरमाटे, प्रसाद सुतार, राजश्री खरमाटे, रोहिणी शिंदे, अश्विनी शेंडे, चेतन सानप आदींनी छापा टाकून या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील ॲल्युमिनियम भांड्यासह एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अमरसिंह सूर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.
फोटो :
ओळ : विटा येथे केटरिंग गोडाउनचे कुलूप तोडून लाखाचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या सराईत चोरट्यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील साहित्य जप्त करण्यात आले.