दिघंचीत पेयजल योजनेच तीन कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:27 AM2021-03-23T04:27:28+5:302021-03-23T04:27:28+5:30

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील वंचित वाड्या-वस्त्यांवरील वस्त्यांना राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजनेस तीन कोटी पाच लाख निधी ...

Three crore sanctioned for drinking water scheme in Dighanchit | दिघंचीत पेयजल योजनेच तीन कोटी मंजूर

दिघंचीत पेयजल योजनेच तीन कोटी मंजूर

Next

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील वंचित वाड्या-वस्त्यांवरील वस्त्यांना राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजनेस तीन कोटी पाच लाख निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य केशवराव मिसाळ यांनी दिली.

ते म्हणाले, खासदार संजयकाका पाटील व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, सभापती हर्षवर्धन देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे ही योजना मार्गी लागत आहे.

दिघंचीमधील वार्ड क्रमांक एक, दोन व सहा या वार्डांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. या योजनेतून दोन नवीन टाक्या बांधल्या जाणार आहेत, तर याचा फायदा दहा हजार लोकसंख्येला होणार आहे. माणसी पंचावन्न लिटर पाणी दरदिवशी मिळणार आहे.

चौकट

टँकरमुक्त भाग

या योजनेसाठी खासदार संजयकाका पाटील, अमरसिंह देशमुख, हर्षवर्धन देशमुख यांचेच योगदान असून, याचा लाभ दिघंची मधील ४० वाड्या वस्त्यांना होणार आहे. यामुळे हा भाग कायमस्वरूपी टँकरमुक्त होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Three crore sanctioned for drinking water scheme in Dighanchit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.