कुपवाडमध्ये तीन धोकादायक इमारती जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:07+5:302021-06-24T04:19:07+5:30
कुपवाड : महापालिका प्रशासनाकडून शहरातील १५ पैकी तीन धोकादायक इमारती बुधवारी जमीनदोस्त करण्यात आल्या, अशी माहिती सहायक आयुक्त दत्तात्रय ...
कुपवाड : महापालिका प्रशासनाकडून शहरातील १५ पैकी तीन धोकादायक इमारती बुधवारी जमीनदोस्त करण्यात आल्या, अशी माहिती सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारती उतरवून घ्या, अशा नोटिसा महापालिका प्रशासनाने १५ धोकादायक इमारत मालकांना दिल्या होत्या. अतिधोकादायक इमारती मालकांना ४८ तासांची व धोकादायक इमारत मालकांना ७ दिवसांची नोटीस बजावण्यात आली होती.
दरम्यान, नोटीस पोहोचताच बऱ्याच इमारत मालकांनी स्वत:च धोकादायक इमारती उतरवून घेतल्या आहेत. ज्या इमारती उतरवून घेतलेल्या नाहीत, त्या महापालिका प्रशासनाकडून उतरवून घेण्याचे काम सुरू आहे.
बुधवारी महापालिका प्रशासनानेे शहरातील तीन इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. पाच मालकांनी स्वत:च धोकादायक इमारती उतरवून घेतल्या आहेत.
यावेळी शाखा अभियंता अशोक कुंभार, स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे, अनिल पाटील, अतुल आठवले, सिद्धांत ठोकळे, वरिष्ठ लिपिक गजानन खुळे, प्रज्ञावंत कांबळे, अनिल मुळीक उपस्थित होते.
फोटो ओळ : कुपवाड शहरातील धोकादायक इमारती जमीनदोस्त करताना महापालिका अधिकारी व कर्मचारी.