Sangli : कृष्णा नदी पुलावरून कार कोसळली, तीन ठार
By हणमंत पाटील | Published: November 28, 2024 12:16 PM2024-11-28T12:16:54+5:302024-11-28T12:18:27+5:30
सुरेंद्र दुपटे सांगली / संजयनगर: कोल्हापूर रोडवरील कृष्णा नदीच्या पुलावर उदगाव येथे पुलावरून चारचाकी गाडी खाली कोसळून भीषण अपघात ...
सुरेंद्र दुपटे
सांगली / संजयनगर: कोल्हापूर रोडवरील कृष्णा नदीच्या पुलावर उदगाव येथे पुलावरून चारचाकी गाडी खाली कोसळून भीषण अपघात झाला. अपघातात तीन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
सांगलीच्या गावभागातील प्रसाद खेडेकर, त्यांच्या पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर आणि वैष्णवी संतोष नार्वेकर अशी मृतांची नावे आहेत. तर समरजीत प्रसाद खेडेकर (वय ७), वरद संतोष नार्वेकर (१९) व साक्षी संतोष नार्वेकर (४२, सर्व रा.सांगली) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, यापुर्वी याच ठिकाणी आतापर्यंत तीन वेळा चार चाकी वाहने कोसळली आहेत.