Sangli: पंचवीस हजारांची लाच घेताना मंडल अधिकार्‍यासह तिघांना अटक, मृत्यूपत्राची नोंद करण्यासाठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 06:23 PM2024-10-24T18:23:10+5:302024-10-24T18:23:34+5:30

सांगली : मृत्युपत्राची दप्तरी नोंद करून सातबारा देण्यासाठी २४ हजाराची लाच घेताना पेठ (ता. वाळवा) येथील मंडल अधिकारी मल्हारी ...

Three mandal officers arrested for taking bribe of twenty five thousand in Sangli, demand to register death certificate | Sangli: पंचवीस हजारांची लाच घेताना मंडल अधिकार्‍यासह तिघांना अटक, मृत्यूपत्राची नोंद करण्यासाठी मागणी

Sangli: पंचवीस हजारांची लाच घेताना मंडल अधिकार्‍यासह तिघांना अटक, मृत्यूपत्राची नोंद करण्यासाठी मागणी

सांगली : मृत्युपत्राची दप्तरी नोंद करून सातबारा देण्यासाठी २४ हजाराची लाच घेताना पेठ (ता. वाळवा) येथील मंडल अधिकारी मल्हारी शंकर कारंडे (वय ४९), महादेववाडीच्या तलाठी सोनाली  कृष्णाजी पाटील, (वय ३५), कोतवाल हणमंत यशवंत गोसावी या तिघांना अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

महादेववाडी परिसरातील तक्रारदार यांच्या आजोबानी तक्रारदार यांचे वडील व्यसनी असल्याने त्यांची मौजे महादेववाडी (ता.वाळवा) येथील वडिलोपार्जित जमीन त्यांच्या आईच्या नावाने केली होती. त्यासाठी २००४ मध्ये मृत्युपत्र करून ठेवले होते. २००९ मध्ये तक्रारदार यांचे आजोबा मृत झाले होते. तक्रारदार यांनी सुमारे आठ ते नऊ महिन्यापूर्वी तलाठी सोनाली पाटील यांच्याकडे  मृत्युपत्राची नोंद होण्यासाठी आईच्या नावाचा अर्ज दिला होता. मृत्युपत्राची दप्तरी नोंद करून तक्रारदार यांचे आईचे सातबारा सदरी नाव लावून देण्यासाठी तलाठी, मंडल अधिकारी व कोतवाल यांनी दि. २३ रोजी २५ हजाराची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 

महादेववाडी तलाठी कार्यालय येथे केलेल्या पडताळणीत तिघांनी पंचासमक्ष सुरवातीला २५ हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती २४ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तेव्हा तलाठी सोनाली पाटील यांनी इस्लामपूर तहसील कार्यालयासमोरील हॉटेल आण्णा बुट्टे मध्ये तक्रारदार यांच्याकडून २४ हजार रुपये लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तलाठी पाटील, मंडल अधिकारी कारंडे, कोतवाल गोसावी या तिघांना ताब्यात घेऊन इस्लामपूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

उपअधीक्षक उमेश पाटील, पोलिस निरीक्षक किशोरकुमार खाडे, अंमलदार सीमा माने, प्रीतम चौगुले, अजित पाटील आदींच्या पथकाने कारवाई केली.

सलग दुसर्‍यांदा अशी कारवाई

तासगाव तालुक्यात नुकतेच महसूल विभागीत महिलेसह तिघांवर लाचप्रकरणी कारवाई केली होती. त्यानंतर वाळवा तालुक्यात कारवाई केली.

Web Title: Three mandal officers arrested for taking bribe of twenty five thousand in Sangli, demand to register death certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.