बलात्कार करून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 05:52 AM2020-02-16T05:52:33+5:302020-02-16T05:52:36+5:30

याप्रकरणी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. घटनास्थळावर चिट्ठी

Three men arrested for rape and blackmail | बलात्कार करून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना अटक

बलात्कार करून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना अटक

Next

सेनगाव (जि. हिंगोली) : बलात्कार करुन विवाहितेला ब्लॅकमेल करणाºया तिघांना सेनगाव पोलिसांनी अटक केली आहे.
तालुक्यातील २८ वर्षीय महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत २२ डिसेंबर २०१५ रोजी घरात घुसून तिघांनी बळजबरीने अत्याचार केल्याचे नमूद होते. यावेळी ती दोन महिन्यांची गर्भवती होती. आरोपींनी या घटनेचा व्हीडिओ तयार केला व तो गावात दाखवून मयत महिलेची बदनामी करीत होते. या त्रासाला कंटाळून महिलेने १३ फेब्रुवारीला राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. घटनास्थळावर चिट्ठी आढळून आल्यानंतर चंद्रभान गणपत कायंदे, प्रमेश्वर नारायण वावरे, सुरेश नामदेव कायंदे या तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या तिघांना सेनगाव तालुक्यातील जयपूर शिवारातून शनिवारी सायंकाळी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकूर यांनी दिली.

Web Title: Three men arrested for rape and blackmail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.