सांगलीत तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा; ४३जणांवर कारवाई
By शीतल पाटील | Published: October 2, 2023 08:58 PM2023-10-02T20:58:09+5:302023-10-02T20:58:24+5:30
उपअधिक्षकांच्या पथकाची कारवाई
शीतल पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी जुगार अड्डा चालवणाऱ्यांसह ४३ जणांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा मारला.
शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले होते. त्यानुसार उपाधीक्षक जाधव यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. पथकात ग्रामीण आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. रविवारी दुपारी पथकाला कोल्हापूर रस्त्यावरील एका इमारतीत तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकत ४३ जणांवर कारवाई करण्यात आली. पाऊण लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाई करण्यात आलेल्यामध्ये सांगली, नांदणी, शिरोळ, नांद्रे, मिरज, कवठेमहांकाळ, कवठेपिरान, उमळवाडसह कर्नाटकातील जमखंडी, चिक्कोडी परिसरातील जुगाऱ्यांचा समावेश आहे.