शिराळ्यात विशेष कोरोना चाचणी मोहिमेत तिघेजण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:08+5:302021-07-02T04:19:08+5:30
शिराळा : शिराळा शहर व परिसरातील कोरोना संसर्ग नियंत्रित रहावा, या हेतूने खास पथकाद्वारे शहरातील बाजारपेठ परिसरात विनाकारण ...
शिराळा : शिराळा शहर व परिसरातील कोरोना संसर्ग नियंत्रित रहावा, या हेतूने खास पथकाद्वारे शहरातील बाजारपेठ परिसरात विनाकारण फिरणारे आणि कोरोना संक्रमित रुग्णांच्या आजूबाजूच्या परिसरात ३०५ रॅपिड अँटिजन व १३ आर्टिपिसीआर नागरिकांच्या टेस्ट करण्यात आली. यामध्ये तिघांचे कोरोना चाचणी पॉझिटिव्ही आली आहे.
तहसीलदार गणेश शिंदे यांच्या आदेशानुसार नगरपंचायतमार्फत कोरोना तपासणी केली. मुख्याधिकारी योगेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांच्यासह नगरपंचायत, महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासन यांचे संयुक्त पथक नेमण्यात आले.
पहिल्या दिवशी भाजीपाला मार्केट, सोमवार पेठ येथील ११६, दुसऱ्या दिवशी तहसील परिसर येथील ९७ नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या. गुरुवारी एस. टी. बसस्थानक व बाह्य वळण रस्ता येथील परिसरातील नागरिकांच्या अँटिजेन ९२ तर १३ आर्टिफिसीआर टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये तीनजण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
तपासणी पथकात नगरपंचायतच्या कार्यालयीन अधीक्षक सुविधा पाटील, गणपती इंगवले, संजय इंगवले, तात्यासो कांबळे, विकास कापसे, मंडल अधिकारी सागर खैर, तलाठी अभिजित मस्के, हवालदार आर. एस. बामणे, पाणीपुरवठा अभियंता शरदचंद्र पाटील, अभियंता मुनीर लंगरदार, गणपती यादव यांचा समावेश आहे.