सांगलीतील तीनपानी जुगार अड्डा उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:25 AM2020-12-22T04:25:17+5:302020-12-22T04:25:17+5:30
सांगली : शहरातील तीन पानी जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी सुरू केलेली कारवाई सुरूच ठेवली आहे. आनंद चित्रमंदिराशेजारील रस्त्यावर सुरू ...
सांगली : शहरातील तीन पानी जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी सुरू केलेली कारवाई सुरूच ठेवली आहे. आनंद चित्रमंदिराशेजारील रस्त्यावर सुरू असलेला तीन पानी जुगार अड्डा शहर पोलिसांनी रविवारी रात्री उद्ध्वस्त केला. यावेळी जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली, तर रोख रकमेसह जुगाराचे साहित्य, मोबाईल असा सुमारे पाच लाख ५२ हजार ५१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी, रामू वनकवडी (रा. मिरज), नासिर जमादार (रा. कुपवाड), इराप्पा अल्लोळी, लक्ष्मण सावंत (दोघेही रा. कवठेपिरान), राजू वडर (रा. वडर कॉलनी), सुरेश शिंपी, संजय पाटील, मुदस्सर मेस्त्री, प्रशांत शिंदे, सुनील संकपाळ, रामचंद्र कोळी, नवनाथ भोकरे, गजानन देसाई, अजिज शेख (सर्व रा. सांगली) परशुराम मोरे, अशोक पाटील (दोघेही रा. हरिपूर), अरुण पवार, सिद्धेश्वर लोखंडे (दोघेही रा. माधवनगर), नीलेश चव्हाण (रा. समडोळी), अरुण कोळी, संतोष शिंदे, सतीश शिंदे, शिवाजी शिंदे (सर्व रा. सांगलीवाडी) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाेलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी अवैैध व्यवसायावर कडक कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी विक्रांत माने यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
चौकट
मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत जुगार अड्ड्यावरून २७ मोबाईल, रोख रक्कम, पत्त्यांचे सेल, कॅलक्युलेटर व ११ दुचाकी असा सुमारे पाच लाख ५२ हजार ५१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.