'थार' जिंकण्यासाठी भाळवणीत रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 03:47 PM2023-04-09T15:47:41+5:302023-04-09T15:48:57+5:30

विजेत्याबद्दल उत्सुकता शिगेला ; रक्तदानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद

Thrill of bullock cart race in Bhalwani to win 'Thar' suv | 'थार' जिंकण्यासाठी भाळवणीत रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार

'थार' जिंकण्यासाठी भाळवणीत रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार

googlenewsNext

दिलीप मोहिते
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी भाळवणी (ता. खानापूर) येथे आयोजित केलेल्या देशातील सर्वांत मोठ्या बैलगाडी शर्यतीचा थरार रविवारी दुपारी रंगला. शर्यत पाहण्यासाठी शौकिनांनी विक्रमी गर्दी केली. पहिल्या क्रमांकासाठी ठेवण्यात आलेल्या तब्बल १९ लाख रुपये किमतीच्या महिंद्रा ‘थार’ या गाडीचा मानकरी कोण ठरणार याची उत्सुकता शिगेला लागली आहे.

भाळवणी येथे  देशातील सर्वांत मोठ्या बैलगाडी शर्यतीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून तयारी सुरु होती. रविवारी दुपारी अलोट गर्दीत शर्यती रंगल्या. स्पर्धेत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी ट्रॅक्टर व पुढील विजेत्यासाठी दुचाकीचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या रकमेसाठी बैलगाड्यांची नोंदणीही मोठ्या प्रमाणात झाली.
नोंदणीपूर्वी एका बैलगाडीसाठी पाच ते सहा जणांनी रक्तदान करण्याची अट घातली होती. त्यालाही मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धेची भाळवणी हद्दीतील ढवळेश्वर-शेळकबाव रस्त्यावरील मुल्लानगर येथे जय्यत तयारी केली होती. बैलगाडी शर्यतीची सुरवात गोमातेच्या पूजनाने करण्यात आली.

प्रेक्षकांचा सारासार विचार करून पट्ट्याच्या दोन्ही बाजूने साईडला प्रेक्षक गॅलरी उभारली होती. निकालामध्ये कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरासह भव्य स्क्रीनही लावली आहे.

Web Title: Thrill of bullock cart race in Bhalwani to win 'Thar' suv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.