चांदोली राष्ट्रीय उद्यानात 'व्याघ्र गणना' सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 03:20 PM2022-01-15T15:20:14+5:302022-01-15T15:34:03+5:30
व्याघ्र गणनेत झाडावरील ओरखडे, जमिनीवरील पाऊलखुणा, विष्ठा याद्वारे ही गणना केली जाणार आहे.
वारणावती : अखिल भारतीय व्याघ्र प्रगणना २०२२ नुसार १५ ते २१ जानेवारी या कालावधीत होणा-या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र गणणेची सुरुवात आज, शनिवारी करण्यात आली.
चांदोली व्याघ्र प्रकल्पात एकूण १५ टिम या कामासाठी तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टिम मध्ये वन कर्मचारी तसेच स्वयंसेवकांची नेमणूक केली असून अधिकारी सहभागी आहेत. त्यांना व्याघ्र गणणेसाठी आवश्यक साहित्य रेंज फाइंडर, कंपास, प्रथमोपचार किट, आवाजाची गण इ. पुरवण्यात आले आहे. अशी माहिती वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यानी दिली.
व्याघ्र गणनेत झाडावरील ओरखडे, जमिनीवरील पाऊलखुणा, विष्ठा याद्वारे ही गणना केली जाणार आहे. तसेच पौर्णिमेच्या दिवशी पाणवठ्यावरील गणना होणार आहे. ट्रान्झीट लाईन तसेच पाणवठ्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरुन प्राण्याची संख्या निश्चित केली जाणार आहे.
सर्व स्वयंसेवक व वन कर्मचारी यांना गणने बाबत प्रशिक्षण देण्यात आले असून संयोजन वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे करत आहेत.