मोदींचा हिटलरशाही कारभार संपविण्याची हीच योग्य वेळ: उल्का महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:09 PM2019-04-03T23:09:34+5:302019-04-03T23:09:39+5:30

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार हिटलरशाहीप्रमाणे चालू आहे. आजपर्यंतच्या सर्व राजवटीतील सर्वात धोकादायक, संविधानविरोधी, सामाजिक वीण उसवणारी ...

Time for the end of Modi's Hitler rule: Meteor Mahajan | मोदींचा हिटलरशाही कारभार संपविण्याची हीच योग्य वेळ: उल्का महाजन

मोदींचा हिटलरशाही कारभार संपविण्याची हीच योग्य वेळ: उल्का महाजन

Next

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार हिटलरशाहीप्रमाणे चालू आहे. आजपर्यंतच्या सर्व राजवटीतील सर्वात धोकादायक, संविधानविरोधी, सामाजिक वीण उसवणारी राजवट भाजपच्या रूपाने सत्तेच्या केंद्रस्थानी आहे, अशी टीका डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेत्या उल्का महाजन यांनी सांगलीत बुधवारी केली. भांडवलशाही सरकारला पायउतार करण्याची हीच वेळ आहे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
सांगलीतील सर्व पुरोगामी, परिवर्तनवादी पक्ष व संघटनांच्यावतीने बुधवारी ‘श्रमिकांचा जाहीरनामा’ परिषद घेण्यात आली, यावेळी उल्का महाजन बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कॉ. शंकर पुजारी होते. यावेळी सुभाष लोमटे, मुक्ता श्रीवास्तव, डॉ. अभिजित मोरे, चंद्रकांत यादव, डॉ. बाबूराव गुरव, कॉ. धनाजी गुरव, कॉ. रमेश सहस्रबुध्दे, अ‍ॅड्. के. डी. शिंदे, सुमन पुजारी, अमोल पवार, धनराज कांबळे आदी उपस्थित होते.
उल्का महाजन म्हणाल्या की, संविधान जाळणाऱ्यांना, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिकांची हत्या करणाऱ्यांना या देशात अटक होत नाही, कोणतीही शिक्षा होत नाही. पण, संविधान वाचविण्यासाठी कोणी रस्त्यावर उतरले, त्या मुद्द्यावर आवाज उठविला, तर त्याला देशद्रोही ठरविण्यात येते. त्याला तात्काळ अटक करून त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून होत आहे. अशा सरकारला पायउतार करण्याची गरज आहे. एकीकडे सामाजिक मांडणी करत असल्याचे ढोंग करायचे व दुसरीकडे देशातील आर्थिक नाड्या हातात ठेवायच्या, या धारेतील भाजपला त्यांची जागा दाखविण्याची ताकद सर्वसामान्यांमध्ये आहे.
डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, सैनिकांच्या हल्ल्याचे, जवानांच्या बलिदानाचे भांडवल करून त्याचा प्रचारासाठी वापर करणाºया भाजप सरकारचा लोकांच्या प्रश्नांशी संबंध नाही. जाहिरातबाजी आणि भाषणबाजी यावरच लोकांना भुलवले जात आहे.
अभिजित मोरे म्हणाले, ‘मन की बात नको, काम की बात’ हवी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदी काहीच बोलत नाहीत. खासगी रुग्णालयांतील बाजार थांबविण्यासाठी कायदे हवेत. या मागण्यांचा ज्यांच्या जाहीरनाम्यात उल्लेख असेल, त्यांनाच मतदान करा.
शंकर पुजारी म्हणाले, ही लढाई पक्षाची नसून सर्वसामान्य जनतेची आहे. चंद्रकांत यादव म्हणाले, नातीगोती, हितसंबंध व जातीपातीवर निवडणुका होत आहेत. सुभाष लोमटे म्हणाले, कष्टकºयांसाठी अनेक कायदे होतात. पण, त्यांची कधीच अंमलबजावणी होत नाही.
कॉ. धनाजी गुरव यांनी जाहीरनाम्याबद्दलची संकल्पना सांगितली.

Web Title: Time for the end of Modi's Hitler rule: Meteor Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.