मलेशियातील अडकलेल्या तरुणांच्या सुटकेचा आज निकाल, सांगलीतील दोघांनी फसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:46 PM2017-12-11T12:46:55+5:302017-12-11T12:54:37+5:30
नोकरीनिमित्त गेल्यानंतर वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियाच्या तुरुंगात अडकलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी भारतीय महाराष्ट्र खात्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या तरुणांची ११ डिसेंबरला (सोमवार) वकील भेट घेऊन ते कसे अडकले आहेत, याचा घटनाक्रम घेऊन १२ डिसेंबरला न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी बाजू मांडणार आहेत.
सांगली : नोकरीनिमित्त गेल्यानंतर वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियाच्या तुरुंगात अडकलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी भारतीय महाराष्ट्र खात्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या तरुणांची ११ डिसेंबरला (सोमवार) वकील भेट घेऊन ते कसे अडकले आहेत, याचा घटनाक्रम घेऊन १२ डिसेंबरला न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी बाजू मांडणार आहेत.
गुरुनाथ कुंभार (रा. शिरवळ, जि. सोलापूर)
सांगलीतील पोलिसपुत्र कौस्तुभ सदानंद पवार व धीरज पाटील या दोघांनी मलेशियात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गुरुनाथ कुंभार (रा. शिरवळ, जि. सोलापूर), मोहन शिंदे (बेलवंडी, जि. अहमदनगर), दीपक माने (मानेवाडी, जि. सोलापूर) व सदानंद धनगर (जळगाव) या चौघांकडून पाच ते सहा लाख रुपये घेतले.
मोहन शिंदे (बेलवंडी, जि. अहमदनगर)
मलेशियात गेल्यानंतर या तरुणांना हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली. पण वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशिया पोलिसांनी या तरुणांना अटक केली. सध्या हे तरुण मलेशियाच्या तुरुंगात आहेत. परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी या तरुणांच्या सुटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले.
कागल येथील प्रवीण नाईक हे मलेशियात मुुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मुळे यांनी नाईक यांच्या मदतीने या तरुणांना वकील मिळवून दिला आहे. हे वकील सोमवारी मलेशियाच्या तुरुंगात जाऊन चारही तरुणांची भेट घेऊन ते या प्रकणार कसे अडकले, याची माहिती घेणार आहेत.
त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करुन मंगळवारी होणाऱ्या सुनावणीवेळी न्यायालयात बाजू मांडणार आहेत. या तरुणांच्या सुटकेचा आदेश होताच त्यांना भारतीय दुतावासाच्या ताब्यात घेऊन महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.