टॉयलेट... उमेदवाराची एक उसनवारी कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 11:26 PM2017-09-25T23:26:37+5:302017-09-25T23:26:37+5:30

Toilets ... A Reward Story of Candidates | टॉयलेट... उमेदवाराची एक उसनवारी कथा

टॉयलेट... उमेदवाराची एक उसनवारी कथा

googlenewsNext



अण्णा खोत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मालगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मिरज तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी शौचालयाची अट पूर्ण करण्यासाठी उसनवारीची शक्कल लढविली आहे. शेजाºयाचे शौचालय वापरत असल्याचे करारपत्राने दाखवून निवडणूक लढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. निवडणुकीपुरता सुरु असलेला हा फसवाफसवीचा प्रकार ग्राह्य धरला जाणार का? हे अर्ज छाननीदिवशी घेतल्या जाणाºया हरकतीवरुन स्पष्ट होणार आहे. टॉयलेटच्या अटीने उसनवारीची नवी कथा तालुक्यात जन्माला आली आहे.
तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे धुमशान सुरु आहे. सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याने या निवडणुका अधिक चर्चेत आल्या आहेत. सरपंच निवड सदस्यांतून होणार नसल्याने या पदासाठी इच्छुकांची मांदियाळी झाल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. सरपंच पदासाठी उमेदवारांची संख्या वाढल्यास तितकीच पॅनेलचीही संख्या दिसून येणार आहे. एका-एका गावात तीन ते चार सरपंच पदाचे दावेदार दिसून येत आहेत. अशा चौघांनीही स्वतंत्र पॅनेलचे नियोजन सुरु केले आहे. मात्र त्यांना सदस्य पदासाठी उमेदवार मिळविणे फारच जिकिरीचे झाले आहे. सरपंच पदाच्या मतदानासाठी सदस्य पदाच्या उमेदवाराचीही मदत होणार असल्याने, खर्चासह सर्वच जबाबदारी घेऊन सदस्य पदाचे उमेदवार ओढून-ताणून पॅनेलमध्ये घेतले जात आहेत. त्यांच्यापैकी बºयाच जणांकडे शौचालय नाही. निवडणूक लढविण्यासाठी सर्वच उमेदवारांना कागदपत्रांच्या सुमारे अठरा अटींची पूर्तता करावी लागणार आहे. यामधील शौचालय ही प्रमुख अट आहे. सदस्य पदासाठी बळजबरीने उभ्या केलेल्या ज्या उमेदवाराकडे शौचालय नाही, अशांनी शेजाºयाकडे असणाºया शौचालयाची उसनवारी करुन निवडणुकीपुरती प्रशासनाची फसवणूक करण्याची नामी शक्कल लढविली आहे.
शेजाºयाचे शौचालय वापरत असल्याचे दाखविण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारपत्र तयार करुन, ते उमेदवारी अर्जासोबत जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. संबंधित उमेदवार खरोखरच शेजाºयाचे शौचालय वापरत असेल, तर हे करारपत्र यापूर्वी करणे आवश्यक होते. केवळ निवडणुकीची अट पूर्ण करण्यासाठी ते केले असेल, तर ते योग्य ठरणार का? हे अर्ज छाननीदिवशी स्पष्ट होणार आहे. शौचालय उसनवारीची लढविलेली नामी शक्कल ग्राह्य धरली गेलीच, तर निवडणुकीसाठी शौचालयाची अट का घातली गेली आहे? हा प्रश्न निर्माण होणार आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी उमेदवाराचे स्वत:चे शौचालय असावे किंवा शेजाºयाचे करारपत्राने चालेल, याबाबतची भूमिका प्रशासनालाही तातडीने जाहीर करावी लागणार आहे. तरच हा प्रकार थांबणार आहे.
करारपत्रावर हरकतीची शक्यता!
निवडणूक लढविण्यासाठी शौचालय नसणाºया इच्छुक उमेदवारांचा शेजाºयाचे शौचालय वापरत असल्याचे भासविण्याचा करारपत्राद्वारे प्रयत्न सुरु आहे. अर्ज छाननीदिवशी त्यावर विरोधी गटाकडून हरकत घेतली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हरकत घेतल्यास अधिकाºयांना त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. निवडणुकीनंतरही हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Web Title: Toilets ... A Reward Story of Candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.