रत्नागिरी-नागपूर महामार्गावर टोल वसुली; रस्त्याची कामे पूर्ण होण्याआधीच पथकर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 03:57 PM2022-08-20T15:57:12+5:302022-08-20T15:58:03+5:30

रस्त्याची कामे पूर्ण होण्यापूर्वीच पथकर सुरू

Toll Collection on Ratnagiri-Nagpur Highway; Even before the road works are completed, the road toll will be started | रत्नागिरी-नागपूर महामार्गावर टोल वसुली; रस्त्याची कामे पूर्ण होण्याआधीच पथकर सुरू

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर टोल वसुली; रस्त्याची कामे पूर्ण होण्याआधीच पथकर सुरू

googlenewsNext

सांगली/शिरढोण : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरसांगली, नाझरे व इंचगाव येथे पथकर वसुली मंगळवारी (दि. १६) रात्रीपासून सुरू झाली. रस्त्याची कामे पूर्ण होण्यापूर्वीच पथकर सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महामार्ग प्राधिकरणाने यासंदर्भातील अधिसूचना १५ ऑगस्ट रोजी जारी केली. त्याच रात्री तत्काळ वसुलीही सुरू झाली. २४ तासांचीही फुरसत दिली नाही. गेल्या वर्षभरात मिरज ते मोहोळदरम्यान टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू होती. पण बरीच कामे अद्याप अपूर्णही आहेत. उड्डाणपूल, सेवारस्ते पूर्ण नाहीत. मिरज ते मालगाव हा सुमारे ३० किलोमीटरचा महामार्ग व सेवारस्ता अर्धवट आहे. तरीही पथकर सुरू झाला आहे. बोरगाव नाक्यावर ६५ किलोमीटर अंतरासाठीचा पथकर वसूल केला जाणार आहे.

दरम्यान, बोरगावपासून पुढे ६० किलोमीटरवर सोलापूर जिल्ह्यातील नाझरे मठ येथे अनकढाळ नाकाही याच दिवशी सुरू झाला. ४९.२९१ किलोमीटर लांबीसाठी पथकर वसूल होईल. याला परिसरातील २० गावांचा विरोध असून, करमाफीची मागणी केली आहे. तालुक्याला म्हणजे सांगोल्याला जाण्यासाठी महिन्याला ३१५ रुपयांच्या पासचा भुर्दंड सोसावा लागेल, असा ग्रामस्थांचा आक्षेप आहे. अनकढाळपुढील इंचगाव नाक्यावरही वसुली सुरू झाली आहे.

प्रकल्प खर्च ७९४० कोटी

सांगली ते सोलापूरदरम्यान महामार्गासाठी ७ हजार ९४० कोटी १ लाख रुपये खर्च आहे. त्याच्या वसुलीनंतर पथकर ४० टक्क्यांनी कमी केला जाईल, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

पथकर असा

  • कार, जीप, हलके वाहन - एकेरी ६५, दुहेरी १०० रुपये
  • मासिक पास (५० फेऱ्या) - २ हजार २४० रुपये
  • जिल्ह्यांतर्गत वाणिज्य वाहने - ३५ रुपये
  • हलके वाणिज्य वाहन, मिनीबस - एकेरी ११०, दुहेरी १६५, मासिक पास ३ हजार ६१५ रुपये
  • ट्रक, बस - एकेरी २२५, दुहेरी ३४०, पास ७ हजार ५७५ रुपये
  • व्यावसायिक एकेरी २५०, दुहेरी ३७०, पास ८ हजार २६५ रुपये
  • खोदकामाची उपकरणे, जड व्यावसायिक वाहने - एकेरी ३५५, दुहेरी ५३५, पास ११ हजार ८८० रुपये
  • अवजड वाहने - एकेरी ४३५, दुहेरी ६५०, पास १४ हजार ४६५ रुपये
  • नाक्यापासून २० किलोमीटरमधील बिगर व्यावसायिक वाहनांसाठी पास ३१५ रुपये. (महिन्याला एक हजारवेळा प्रवासाला मुभा)

Web Title: Toll Collection on Ratnagiri-Nagpur Highway; Even before the road works are completed, the road toll will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.