पलूस-कडेगाव मतदारसंघात टोलनाका होऊ देणार नाही -: विश्वजित कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:46 AM2019-07-03T00:46:15+5:302019-07-03T00:48:53+5:30
विजापूर-गुहागर महामार्गावर कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी ते शिवणी फाटादरम्यान होणाऱ्या टोलनाक्याला तीव्र विरोध करीत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. कोणत्याही
प्रताप महाडिक ।
कडेगाव : विजापूर-गुहागर महामार्गावर कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी ते शिवणी फाटादरम्यान होणाऱ्या टोलनाक्याला तीव्र विरोध करीत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. कोणत्याही परिस्थितीत पलूस कडेगाव मतदारसंघात टोलनाका होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
विश्वजित कदम म्हणाले, दोन वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने गुहागर-विजापूर (१६६ ई) हा २८३..०८० किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला. सध्या या महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गामुळे येथील दुष्काळी भाग कोकण व कर्नाटकशी जोडला जाणार आहे. रस्ताही चांगल्या दर्जाचा होणार आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे.
परंतु या महामार्गावर शिवणी फाटा ते येवलेवाडीदरम्यान टोलनाका उभारण्याबाबत हालचाली सुरु आहेत. यासाठी लागणाºया निधीची तरतूद ही महामार्गाच्या निधीतच केलेली आहे. त्यामुळे कडेगाव ते विटा यादरम्यान सध्या महामार्ग बांधणीचे काम करणारी एजन्सीच हा टोलनाका उभारणार आहे. त्यासाठी येथे भूसंपादनही करण्यात येत आहे. त्यामुळे या महामार्गावरुन जाणाºया प्रत्येक चारचाकी वाहनधारकांना येथे टोल द्यावा लागणार आहे. तालुक्यातील स्थानिक नागरिकांना या महामार्गावरुन सतत ये-जा करावी लागणार असल्याने त्यांनाही टोलनाक्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळेच परिसरातीला गावांमधून नागरिकांचा येथे टोलनाका उभारण्यासाठी तीव्र विरोध आहे.
कडेगाव ते विटा रस्त्यावर वीस किलोमीटरच्या परिघात विटा नगरपालिका, कडेगाव नगरपंचायत व चाळीस ते पन्नास खेडी येतात. लाखो लोक या टोलनाक्याने प्रभावित होणार आहेत.
शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड
कडेगाव ते विटा या मार्गावर दररोज हजारो व्यावसायिक, शेतकरी, नोकरदार स्वत:च्या चारचाकी वाहनाने ये-जा करतात. या मार्गावरून बहुतांश शेतकºयांचा फळे व भाजीपाला वाहनांद्वारे कºहाडकडे जातो. टोलनाक्यामुळे या सर्व वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हा अन्यायी टोलनाका पलूस कडेगाव मतदार संघात होऊ देणार नाही, असा इशारा कदम यांनी यावेळी दिला.