सांगलीत पुरोगामी संघटनांची मशाल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 11:49 AM2017-10-31T11:49:46+5:302017-10-31T11:52:32+5:30
सांगली : विचारवंतांच्या हत्याप्रकरणी हल्लेखोरांना पकडण्यात शासनाला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ सोमवारी पुरोगामी संघटनांनी सांगलीत मशाल फेरी काढली.पुरोगामी कार्यकर्ते सायंकाळी ७ वाजता सांगलीमध्ये महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकत्रित झाले होते.
सांगली : विचारवंतांच्या हत्याप्रकरणी हल्लेखोरांना पकडण्यात शासनाला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ सोमवारी पुरोगामी संघटनांनी सांगलीत मशाल फेरी काढली. पुरोगामी कार्यकर्ते सायंकाळी ७ वाजता सांगलीमध्ये महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकत्रित झाले होते.
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, सामाजिक कार्यकर्ते कॉ. गोविंद पानसरे, लेखक प्रा. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हल्लेखोरांना पकडण्यात सरकारला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. पुरोगामी कार्यकर्ते सायंकाळी ७ वाजता सांगलीमध्ये महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकत्रित झाले होते. तेथे मशाल प्रज्वलित करण्यात आली.
शहरातील प्रमुख मार्गावरुन मशाल फेरी काढण्यात आली. यावेळी विचारवंतांच्या खुनाचा तपास योग्य पद्धतीने न करणाºया केंद्र व राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. घोषणाबाजी करण्यात आली. दिल्ली येथे १८ सप्टेंबरला झालेल्या विविध जनसंघटनांच्या मेळाव्यामध्ये एकाचदिवशी देशभर असे निषेध आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून सांगली शहरात हे आंदोलन करण्यात आले.
यामध्ये कॉ. उमेश देशमुख, अंनिसचे राहुल थोरात, ज्योती आदाटे, वीज कर्मचारी संघटनेचे रमेश सहस्रबुध्दे, अॅड. सुधीर गावडे, लाल निशाण पक्षाचे अमित ठकार, अॅड. राहुल जाधव, बांधकाम कामगार संघटनेचे इब्राहीम पेंढारी, राजू पाटील, नंदकुमार चौगुले, करीम मुजावर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.