विद्यार्थ्यांमधील कणखरपणा हा डोंगरी भागाने दिलेला वारसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:48 AM2021-02-28T04:48:30+5:302021-02-28T04:48:30+5:30

ओळ : बेरडेवाडी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेस पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांनी भेट दिली. यावेळी सर्जेराव ...

The toughness among the students is the legacy of the hill country | विद्यार्थ्यांमधील कणखरपणा हा डोंगरी भागाने दिलेला वारसा

विद्यार्थ्यांमधील कणखरपणा हा डोंगरी भागाने दिलेला वारसा

googlenewsNext

ओळ : बेरडेवाडी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेस पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांनी भेट दिली. यावेळी सर्जेराव कुंभार, मुख्याध्यापिका सुप्रिया घोरपडे, जितेंद्र लोकरे उपस्थित हाेते.

लोकमत न्यूज नेटवर्क

वारणावती : विद्यार्थ्यांमधील कणखरपणा हा डोंगरी भागाने दिलेला वारसा आहे, असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांनी केले.

बेरडेवाडी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेला नायकवडी यांनी भेट दिली. डिजिटल क्लासरूम, शालेय रंगकाम, शालेय कागदपत्रांची त्यांनी पाहणी केली. नायकवडी म्हणाले, एखाद्या दुर्गम-डोंगराळ भागात असे प्रगतीचे पुष्प उमलू शकते की ज्याचा सुगंध फक्त तालुक्यातच नव्हे तर राज्यापर्यंत पसरतो. इथल्या विद्यार्थ्यांमध्ये कणखरपणा, जिद्द व चिकाटी ठासून भरलेली आहे. हा डोंगरी भागाने दिलेला वारसा आहे.

यावेळी पंचायत समितीचे सर्जेराव कुंभार, मुख्याध्यापिका सुप्रिया घोरपडे, उपक्रमशील शिक्षक जितेंद्र लोकरे, जयदीप बल्लाळ, नामदेव डाकोरे उपस्थित होते.

Web Title: The toughness among the students is the legacy of the hill country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.