सोनलगीत बोर नदीपात्रातून ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:30 AM2021-05-25T04:30:56+5:302021-05-25T04:30:56+5:30
संख : सोनलगी (ता. जत) येथे महसूल विभाग व उमदी पोलिसांच्या संयुक्त पथकाने बोर नदीत अवैध वाळू उपसा करणारा ...
संख : सोनलगी (ता. जत) येथे महसूल विभाग व उमदी पोलिसांच्या संयुक्त पथकाने बोर नदीत अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर पकडला. ही कारवाई रविवारी सायंकाळी सहा वाजता केली. ट्रॅक्टर जप्त करून उमदी पोलीस ठाण्यात लावला आहे.
पूर्व भागातील बोर नदी वाळू तस्करीचे केंद्र आहे. वाळू उपशाने तस्करी सुरू आहे. पाण्याची पातळी खालावली आहे. लाॅकडाऊनचा फायदा घेत वाळू उपसा सुरू होता. अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे व उमदी पोलिसांच्या संयुक्त पथकाला सोनलगी बोर नदीपात्रात वाळू भरताना निळ्या रंगाचा विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर आढळून आला.
पथकाला पाहून ट्राॅलीतील वाळू पात्रातच ओतली. पळून जाताना अपघात होता होता वाचला. पथकांनी ट्रॅक्टर पकडून पोलीस ठाण्यात लावला आहे.
अप्पर तहसीलदार म्हेत्रे, तलाठी राजेश चाचे, गणेश पवार, शंकर बागेळी, विनायक बालटे, नितीन कुंभार, सचिन शिंदे, राहुल कोळी, पोलीस अंमलदार सिध्देश्वर मोरे, संभाजी करांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. मालकावर गौण खनिज उत्खनन कायद्यानुसार दंड आकारणी केली जाणार आहे.
फोटो ओळ : सोनलगी (ता. जत) येथे बोर नदीपात्रात अवैध वाळू उपसा करत असताना महसूल विभागाच्या पथकाने ट्रॅक्टर पकडला.