सोनहिरा परिसरातील व्यापार २५ दिवसांपासून ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:25 AM2021-07-26T04:25:16+5:302021-07-26T04:25:16+5:30
देवराष्टे : सोनहिरा परिसरात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता जुलै महिन्याच्या १ तारखेपासून गावाेगावी व्यवस्थापन समित्या, तालुका व जिल्हा ...
देवराष्टे : सोनहिरा परिसरात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता जुलै महिन्याच्या १ तारखेपासून गावाेगावी व्यवस्थापन समित्या, तालुका व जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या दिवशी बंदची हाक दिल्याने तब्बल २५ दिवसांपासून सोनहिरा परिसरात व्यापार व्यवसाय बंद आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सोनहिरा परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. कडेगाव तालुक्यातील ५० टक्के रुग्ण सोनहिरा परिसरात आढळत आहेत. प्रत्येक गावात व्यवस्थापन समित्यांनी गाव व व्यापार बंदची हाक दिली. आठ दिवस सर्व व्यवहार बंद केले. सुरुवातीला व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसादही दिला. पण नंतर रुग्णसंख्या कमी होत नसल्याने तालुका प्रशासनाने पुन्हा सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश काढले. नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दुकाने, भाजीपाला विक्रीसह सर्वच व्यवहार बंद आहेत. यामुळे गेल्या २५ दिवसांपासून व्यापार बंद असल्याने शेतकऱ्याचा भाजीपाला शेतात सडून जाऊ लागला तर दर पाडून व्यापारी भाजीपाल्याची खरेदी करीत आहेत. गेल्या २५ दिवसांपासून दुकाने बंद असल्याने व्यापारी आंदोलनाच्या तयारीत आहेत.
चौकट
देवराष्ट्रे येथील व्यापारी सोमवार २६ जुलै रोजी प्रशासनाला निवेदन देऊन दुकाने चालू करण्याची विनंती करणार आहेत. दुकाने चालू करण्यास परवानगी न दिल्यास आंदोलन करणार असल्याचे राजेश गायगवाळे, प्रमोद गावडे यांनी सांगितले.