दोन्ही काँग्रेसकडून स्वबळाची तालीम

By admin | Published: October 24, 2016 12:15 AM2016-10-24T00:15:34+5:302016-10-24T00:15:34+5:30

विधानपरिषद निवडणूक : आघाडीचे सूर बिघडले

Training by both the Congress | दोन्ही काँग्रेसकडून स्वबळाची तालीम

दोन्ही काँग्रेसकडून स्वबळाची तालीम

Next

सांगली : आघाडीच्या माध्यमातून एकहाती सांगली-सातारा विधानपरिषदेचे मैदान मारण्याचे दोन्ही काँग्रेसचे मनसुबे उधळले गेले आहेत. राष्ट्रवादीने मतदार संघातील ताकदीच्या जोरावर जागेचा दावा सोडला नाही, तर काँग्रेसने राष्ट्रवादीपेक्षा कमी संख्याबळ असतानाही, स्वबळाचा नारा देऊन मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेस सध्या आमने-सामने दिसत आहेत.
शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांच्या आग्रहानुसार ही जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ पातळीवर आघाडीची चर्चा यशस्वी होईल, अशी आशा राष्ट्रवादीला होती. मात्र काँग्रेस नेत्यांनी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू न ठेवता, थेट अट घालून स्वबळाचा इशारा दिला.
सांगली-साताऱ्याची जागा यंदा आम्हाला मिळाली नाही, तर काँग्रेस स्वत:च्या ताकदीवर मैदानात उतरेल, असे स्पष्ट केल्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादीची ताकद अन्य कोणत्याही पक्षापेक्षा अधिक आहे. त्यामुळे ही जागा जिंकण्याची सर्वाधिक खात्री राष्ट्रवादी नेत्यांना वाटते.
ताकद असूनही राष्ट्रवादीला तुल्यबळ उमेदवारीमुळे धाकधुकही वाटत आहे. पक्षीय ताकदीच्या गणितावर विधानपरिषदेची निवडणूक लढविली जात नसल्याची चांगली जाणीव राष्ट्रवादी नेत्यांना आहे. नानासाहेब महाडिक यांनी स्वत:च्या ताकदीवर खेचलेली भरमसाट मते, हे त्याचेच उदाहरण आहे. महाडिक ज्या गोष्टी करू शकतात, त्या गोष्टी त्यांच्यासारखाच अन्य तुल्यबळ उमेदवारही करू शकतो, याचीही कल्पना राष्ट्रवादीला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने काँग्रेस नेत्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ही जागा लढविण्यासाठी कंबर कसली आहे. बैठकांवर बैठका सुरू असताना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आतापासूनच काँग्रेसला चितपट करण्याची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)

बैठक : औपचारिक
ताएकूणच विधानपरिषदेच्या या जागेवर दोन्ही काँग्रेस आमने- सामने येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. २६ आॅक्टोबर रोजी आघाडीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे. तरीही काँग्रेसची स्वबळाची भूमिका जाहीर झाल्यामुळे चर्चेतून फारसे काही निष्पन्न होण्याची शक्यता कमी आहे.
काँग्रेस नेते म्हणतात...
४काँग्रेस गतवेळी आघाडीतर्फे राष्ट्रवादीला जागा दिल्याने यंदा ती काँग्रेसला मिळायला हवी
४संख्याबळावर जागा वाटपाचे गणित ठरलेच नव्हते
४तुल्यबळ उमेदवार असल्याने जिंकण्याची खात्री
४उमेदवारी सांगलीला मिळायला हवी
४राष्ट्रवादीकडूनच आघाडीचे संकेत पाळले जात नाहीत
 

Web Title: Training by both the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.