डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:27 AM2021-03-23T04:27:39+5:302021-03-23T04:27:39+5:30
आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘नॉईज अॅन्ड व्हायब्रेशन कंट्रोल ऑफ इंडस्ट्रियल मशीन्स’ या विषयावर अखिल भारतीय तंत्रशिक्षण ...
आष्टा : येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘नॉईज अॅन्ड व्हायब्रेशन कंट्रोल ऑफ इंडस्ट्रियल मशीन्स’ या विषयावर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद पुरस्कृत प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव अॅड. चिमण डांगे व कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई यांनी दिली.
प्रा. आर. ए. कनाई म्हणाले, देशातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी यांच्यासह किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, केएसबी पंप्स लिमिटेड, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा, टीसीएस विनिती ऑरगॅनिक लिमिटेड या कंपन्यातील अभियंत्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
प्रा. विक्रम पाटील म्हणाले, या कार्यक्रमात यंत्रातील व्हायब्रेशन व ध्वनीचे स्त्रोत यंत्रातील बिघाडाची कारणे व उपाय यंत्राची योग्य मांडणी यंत्राच्या देखभालीच्या योग्य पद्धती व फिरणाऱ्या धाग्यांचे बॅलेंसिंग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरामुळे अभियंत्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाली आहे.