दुधारीत महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:57+5:302021-09-10T04:32:57+5:30

इस्लामपूर : दुधारी (ता. वाळवा) गावातील सर्व महिलांनी स्वावलंबी व्हावे, यासाठी १५ व्या वित्त योजनेतून ग्रामपंचायतीतर्फे ७ ते ११ ...

Training camp for double-breasted women | दुधारीत महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर

दुधारीत महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर

googlenewsNext

इस्लामपूर : दुधारी (ता. वाळवा) गावातील सर्व महिलांनी स्वावलंबी व्हावे, यासाठी १५ व्या वित्त योजनेतून ग्रामपंचायतीतर्फे ७ ते ११ सप्टेंबरपर्यंत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिला व मुलींसाठी बेकरी प्रोडक्ट, केक, दुग्धजन्य पदार्थ तयार करावयाचे प्रशिक्षण दिले जात आहे.

या शिबिराचे उद्घाटन सरपंच अर्चना पोळ व उपसरपंच कोमल जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. पोळ म्हणाल्या, आजच्या घडीला महिलांनीही व्यवसायात अग्रेसर होणे गरजेचे आहे. स्वतःच्या सबलीकरणासाठी महिलांनी व्यवसाय करणे गरजेचे आहे. जागृती विकास संस्था, कोल्हापूर या संस्थेच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

यावेळी ग्रा. पं. सदस्य अनिता पाटील, सरस्वती काबुगडे, शबानाबी पटेल, परवीन मुजावर, विद्या कोकाटे, सरताज मुल्ला ग्रामसेवक अमर वाटेगावकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Web Title: Training camp for double-breasted women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.