रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार, मिरज-लोंढा मार्गावरील गाड्या रद्द; 'या' गाड्यांच्या मार्गात बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 05:18 PM2023-02-03T17:18:41+5:302023-02-03T17:19:56+5:30

३ ते १३ फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या गाड्या

Trains canceled for doubling on Miraj-Londha railway line, Railway passengers will be inconvenienced, Changes in the route of trains | रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार, मिरज-लोंढा मार्गावरील गाड्या रद्द; 'या' गाड्यांच्या मार्गात बदल

संग्रहीत छाया

Next

मिरज : मिरज - लोंढा मार्गावर घटप्रभा, गोकाक रोडदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी मिरज-हुबळी, मिरज-कॅसरलॉक रेल्वे दि. ३ ते १३ फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
 
अजमेर-म्हैसूर, बंगळुरू-अजमेर, जोधपूर-बंगळुरू, निजामुद्दीन-म्हैसूर, गांधीधाम-बंगळुरू या रेल्वे गाड्या  मिरजेतून पंढरपूर, सोलापूर, होटगीमार्गे वळविण्यात आल्या आहेत.  कोल्हापूर तिरुपती - हरिप्रिया एक्स्प्रेस दोन तास ते पंचवीस मिनिटे उशिरा धावणार आहे. यामध्ये मिरज-हुबळी, हुबळी-मिरज, मिरज-कॅसरलाॅक, कॅसरलाॅक-मिरज या एक्स्प्रेस गाड्या दि. ३ ते १३ फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

अजमेर-म्हैसूर एक्स्प्रेस दि. ३, ५, १०, १२ फेब्रुवारी रोजी मिरज, पंढरपूर, सोलापूर, होटगी, विजापूरमार्गे धावेल. बंगळुरू-अजमेर एक्स्प्रेस दि. ३ व १० रोजी गदग, बागलकोट, विजापूर, होटगी, सोलापूर, पंढरपूर, मिरजमार्गे धावेल. जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेस दि. ४, ९, ११ रोजी मिरज, पंढरपूर, सोलापूर, विजापूरमार्गे धावेल.

बंगळुरू-गांधीधाम एक्स्प्रेस दि. ४ व  ११ रोजी बागलकोट, विजापूर, होटगी, सोलापूर, पंढरपूर, मिरजमार्गे धावेल. बंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस दि. ५, १२ रोजी गदग, बागलकोट, विजापूर, होटगी, सोलापूर, पंढरपूर, मिरजमार्गे धावेल. एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस दि. ६ रोजी पनवेलमार्गे पुण्याच्या दिशेने धावेल. ती मिरज येथून जाणार नाही. हजरत निजामुद्दीन-म्हैसूर स्वर्णजयंती एक्स्प्रेस दि. ६ रोजी दौंड, सोलापूर, होटगी, गदगमार्गे धावेल. ही गाडी पुणे, सातारा, कऱ्हाड, सांगली, मिरज येथे येणार नाही. अजमेर-बंगळुरू एक्स्प्रेस दि. ६ रोजी मिरज, पंढरपूर, सोलापूर, होटगी, विजापूरमार्गे धावेल.

बंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस दि. ६, रोजी हुबळी, गदग, बागलकोट, विजापूर, होटगी, सोलापूर, पंढरपूर, मिरजमार्गे धावेल. गांधीधाम-बंगळुरू एक्स्प्रेस दि. ७ रोजी मिरज, पंढरपूर, सोलापूर, होटगी, विजापूरमार्गे धावेल.  म्हैसूर-अजमेर एक्स्प्रेस दि. ७, ९  रोजी हुबळी, गदग, बागलकोट, विजापूर, होटगी, सोलापूर, पंढरपूर, मिरजमार्गे धावेल.

हरिप्रिया एक्स्प्रेस उशिरा धावणार

जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेस दि. ८ रोजी मिरज, पंढरपूर, सोलापूर, होटगी. विजापूर, बागलकोटमार्गे धावणार आहे. या कालावधीत तिरूपती-हरिप्रिया कोल्हापूर एक्स्प्रेस २ तास २० मिनिटे व कोल्हापूर-तिरूपती एक्स्प्रेस २५ मिनिटे उशिरा धावणार आहे.

Web Title: Trains canceled for doubling on Miraj-Londha railway line, Railway passengers will be inconvenienced, Changes in the route of trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.