आष्ट्यात दिवसभर व्यवहार बंद; बाजारपेठेत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:28 AM2021-04-07T04:28:43+5:302021-04-07T04:28:43+5:30
आष्टा : राज्यात व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आष्टा शहरात पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर सर्वच दुकाने बंद झाली. ...
आष्टा : राज्यात व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आष्टा शहरात पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर सर्वच दुकाने बंद झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांना प्रशासनाने तातडीने व्यवसाय बंद करण्याचे आवाहन केले होते. मात्र, अत्यावश्यक सेवांबरोबर इतर सर्व दुकाने सुरू राहिल्याने शहरातील व्यावसायिकांना पोलिसांनी दुकाने बंद करण्यास सांगितले. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पाेलिसांच्या आवाहनानंतर सर्व दुकाने बंद झाल्यानंतर बाजारपेठेत शुकशुकाट पसरला. सायंकाळनंतर भाजी मंडईत भाजी खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होते. त्याचबरोबर किराणा, मेडिकल, दुग्धव्यवसाय यासह अत्यावश्यक सेवा सुरू हाेती. पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी शहरातील नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्याबरोबर मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन केले आहे.
फोटो : ०६ आष्टा १
ओळ : आष्टा शहरात मंगळवारी दुकानदारांनी व्यवसाय बंद ठेवल्याने शहरात शुकशुकाट होता.