सुवर्णा पत्कींसह पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या
By Admin | Published: April 22, 2017 12:30 AM2017-04-22T00:30:34+5:302017-04-22T00:30:34+5:30
पोलिस विभाग : जिल्ह्यात आठ नवे अधिकारी
सांगली : जिल्हा पोलिस दलातील पाच पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. यामध्ये पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांचाही समावेश आहे. निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्यासह दोन अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या गृह विभागाने नामंजूर केल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्याला नवीन आठ पोलिस अधिकारी मिळाले आहेत.
तुरची (ता. तासगाव) पोलिस प्रशिक्षण केंद्रातील दत्तात्रय बोरीगिड्डे यांची उस्मानाबादला, सखाहरी गडदे यांची राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागात, उदय डुबल यांची कोल्हापूरला, यशवंत केडगे यांची सोलापूर शहरला, तर प्रभारी पोलिस उपअधीक्षक (गृह) सुवर्णा पत्की यांची रत्नागिरीला बदली झाली आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून पद्मावती कदम यांची तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात, नानवीज (दौंड) येथून संभाजी सावंत यांची तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात, अमृत देशमुख यांची कोल्हापूरहून तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात, राजन माने यांची नागपूरहून, राजू ताशिलदार यांची नांदेडहून, रमेश भिंगारदिवे यांची लोहमार्ग पुण्याहून, आप्पासाहेब माळी यांची मुंबईहून, संजय जाधव यांची लातूरहून सांगलीला बदली झाली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री उशिरा गृह विभागाने राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. (प्रतिनिधी)