जिल्ह्यातील पाच पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 08:45 PM2020-10-01T20:45:54+5:302020-10-01T20:47:54+5:30
Police Transfers, sangli news राज्य शासनाने बुधवारी रात्री उशिरा राज्यातील पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यात जिल्ह्यातील पाच अधिकार्यांच्या बदल्या झाल्या असून तीन नवीन अधिकारी जिल्ह्यात दाखल होत आहेत.
सांगली : राज्य शासनाने बुधवारी रात्री उशिरा राज्यातील पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यात जिल्ह्यातील पाच अधिकार्यांच्या बदल्या झाल्या असून तीन नवीन अधिकारी जिल्ह्यात दाखल होत आहेत.
सांगली शहरचे नवीन उपअधीक्षक म्हणून अजित टिके यांची बदली झाली आहे तर सध्याचे उपअधीक्षक अशोक वीरकर यांची मिरजला बदली झाली आहे. मिरजचे उपअधीक्षक संदीपसिंह गिल यांचीही बदली झाली आहे.
बुधवारी शासनाने केलेल्या बदल्यांमधून जिल्ह्यातील अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या उपविभागांना अधिकारी मिळाले आहेत. सांगलीचे उपअधीक्षक अशोक वीरकर यांची मिरजला बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी वाई (जि. सातारा) येथील अजित राजाराम टिके यांची बदली करण्यात आली आहे. वाई उपविभागात टिके यांनी प्रभावी कामगिरी केली आहे.
थेट आयपीएस असलेले व सध्या प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक म्हणून मिरजला कार्यरत संदीपसिंह गिल यांची बदली करण्यात आली असलीतरी त्यांना नवीन नियुक्तीचे ठिकाण अद्याप देण्यात आलेले नाही. गेल्यावर्षी महापूर, यंदाच्या कोरोना कालावधीसह कडकनाथ कोंबडी आर्थिक घोटाळा, तासगाव येथील बँक कर्मचार्यांची लुटमारीसह अन्य महत्वाच्या गुन्ह्यांचा गिल यांनी तपास केला होता.
तासगावच्या उपअधीक्षकपदी अश्विनी रामचंद्र शेंडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या सध्या पवनी (जि. भंडारा) येथे कार्यरत होत्या. तर तासगावचे उपअधीक्षक अशोक बनकर यांची औरंगबाद शहर सहायक पोलीस आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.
उपअधीक्षक जगदाळे यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त असलेल्या जत उपविभागाची सुत्रे आता रत्नाकर ऐजीनाथ नवले स्विकारणार आहेत. नवले यांनी मालेगाव (जि. नाशिक) येथे प्रभावी काम करत गुन्हेगारीला आळा घातला होता.
तुरची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य डॉ. शीतल बाबूराव जानवे यांची वाई उपविभागाच्या उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकार्यांनी तात्काळ नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आल्याने येत्या दोन दिवसात सर्व अधिकारी आपला पदभार स्विकारणार आहेत.