तीस पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By Admin | Published: June 1, 2017 11:44 PM2017-06-01T23:44:08+5:302017-06-01T23:44:08+5:30
तीस पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा पोलिस दलातील १५ पोलिस निरीक्षक व १५ सहाय्यक पोलिस निरीक्षक अशा तब्बल ३० पोलिस अधिकाऱ्यांचे एकाचवेळी खांदेपालट करण्यात आले आहे. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी बदल्यांचा हा आदेश जारी केला. शहरचे अनिल गुजर, सांगली ग्रामीणचे प्रकाश गायकवाड व व कुपवाडचे अशोक भवड यांना बदलण्यात आले आहे.
बदली पोलिस निरीक्षकांची नावे व कंसात कोठून कुठे बदली झाली : पोलिस निरीक्षक अनिल गुजर (सांगली शहर ते पोलिस मुख्यालयातील जिल्हा विशेष शाखा), राजू मोरे (मिरज ग्रामीण ते मानवी संसाधन विभाग-पोलिस कल्याण), एम. बी. पाटील (तासगाव ते कडेगाव), सिराज इनामदार (कवठेमहांकाळ ते पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्ष (कंट्रोल) सांगली), आर. ए. ताशीलदार (नियंत्रण कक्ष ते जत), आर. डी. शेळके (नियंत्रण कक्ष ते सांगली शहर), एस. एम. गिड्डे (नियंत्रण कक्ष ते सुरक्षा शाखा, सांगली), रमेश भिंगारदिवे (नियंत्रण कक्ष ते संजयनगर), प्रकाश गायकवाड (सांगली ग्रामीण ते कवठेमहांकाळ), एम. टी. जाधव (विटा ते मिरज ग्रामीण), के. एस. पुजारी (आटपाडी ते सायबर सेल, सांगली), ए. एम. कदम (सायबर सेल ते एमआयडीसी कुपवाड), रवींद्र डोंगरे (आर्थिक गुन्हे शाखा ते सांगली ग्रामीण), अशोक भवड (कुपवाड ते नियंत्रण कक्ष), युवराज मोहिते (जत ते नियंत्रण कक्ष).
बदली झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नावे आणि कंसात कोठून कुठे बदली झाली : के. बी. कामटे (नियंत्रण कक्ष ते सांगली ग्रामीण), डी. बी. ठाकूर (नियंत्रण कक्ष ते मिरज ग्रामीण), व्ही. बी. पाटील (नियंत्रण कक्ष ते कवठेमहांकाळ), एस. जी. डोके (नियंत्रण कक्ष ते गुंडाविरोधी पथक, सांगली), एन. ए. माने (नियंत्रण कक्ष ते विटा), महिला अधिकारी एस. व्ही. पाटील (विश्रामबाग ते पलूस), एस. बी. बोंदर (नियंत्रण कक्ष ते संजयनगर), एस. ए. हारुगडे (कुरळप ते सांगली शहर), डी. बी. पिसाळ (तासगाव ते विटा), ए. व्ही. शिंदे (पलूस ते नियंत्रण कक्ष), एस. पी. मोरे (कासेगाव ते कुरळप), ए. व्ही. चव्हाण (विटा ते इस्लामपूर), यू. एम. दंडीले (कडेगाव ते कासेगाव), एस. एस. माने (महात्मा गांधी चौक मिरज ते विश्रामबाग पोलिस ठाणे).
दरम्यान, एक ते दोन दिवसांत जिल्ह्यातील २५ पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यातर्गंत बदल्या होणार आहेत.