कोयना, पुणे पॅसेंजरच्या गोंधळाचा प्रवाशांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 10:06 PM2019-11-15T22:06:16+5:302019-11-15T22:07:14+5:30
सध्या पुणे-मुंबईदरम्यान मंकी हिल्स येथे दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच जाते व तेथून परत कोल्हापूरला परतते. ३० नोव्हेंबरपर्यंत हीच स्थिती राहणार आहे. तिचे हे बदललेले वेळापत्रक सांगली-साताऱ्यातील प्रवाशांना गैरसोयीचे ठरले आहे.
सांगली : कोयना एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-पुणे पॅसेंजरच्या वेळापत्रकातील गोंधळामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागत आहे. सांगली, कºहाडसह ताकारी, किर्लोस्करवाडी, भिलवडीच्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
प्रवाशांनी पुणे विभागीय व्यवस्थापकांना निवेदन पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. नोकरदार आणि विद्यार्थ्यांची संख्या खूपच मोठी आहे.
सध्या पुणे-मुंबईदरम्यान मंकी हिल्स येथे दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच जाते व तेथून परत कोल्हापूरला परतते. ३० नोव्हेंबरपर्यंत हीच स्थिती राहणार आहे. तिचे हे बदललेले वेळापत्रक सांगली-साताऱ्यातील प्रवाशांना गैरसोयीचे ठरले आहे.
कोयना पुण्यातून दुपारी साडेतीन वाजता परत फिरते. ती सातारा, कºहाड, शेणोली, किर्लोस्करवाडी, भिलवडी व सांगलीला येण्यास रात्री नऊ ते अकरा वाजतात. ही वेळ प्रवाशांसाठी अत्यंत गैरसोयीची आहे. विश्ोषत: महिला, विद्यार्थी व नोकरदारांचे हाल होत आहेत. पुणे-कोल्हापूर पॅसेंजर कºहाडमध्ये दुपारी चार वाजता येते. सांगली-कोल्हापूरकडे येणारे विद्यार्थी व नोकरदारांना तिचा फायदा होत नाही. स्टेशनवर येईपर्यंत गाडी निघून गेलेली असते. सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर दुसºया रेल्वेसाठी रात्री नऊ-दहापर्यंत थांबावे लागते. प्रवाशांना जास्त पैसे खर्च करुन एसटीने प्रवास करावा लागत आहे. पुणे-कोल्हापूर पॅसेंजर पुण्यातून एक ते दीड तास उशिरा सोडल्यास प्रवाशांना तिचा फायदा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.
पुणे पॅसेंजरला सातत्याने उशीर
कोल्हापूर-पुणे पॅसेंजर पहाटे सहा वाजता मिरजेत येते. तेथून सांगलीत येण्यास मात्र तब्बल पाऊण तास घेते. पावणेसात ते सात वाजून जातात. दहा मिनिटांच्या अंतरासाठी गाडी तासभर घेते. प्रशासनातील समन्वयाअभावी गाडी विलंबाने धावत आहे. कºहाड-साताºयाकडे जाणाºया प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. तक्रार करूनही सुधारणा झाली नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.