पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:19 AM2021-06-06T04:19:51+5:302021-06-06T04:19:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शनिवारी जिल्हा न्यायालय परिसरात जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व दि सांगली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शनिवारी जिल्हा न्यायालय परिसरात जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व दि सांगली बार असोसिएशनतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पाटील यांनी शक्य आहे तेथे वड, लिंब, पिंपळ अशी दीर्घायुष्यी झाडे लावण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश डी. पी. सातवळेकर, एस. पी. पोळ, दिवाणी न्यायाधीश एल. हुली, मुख्य न्यायदंडाधिकारी . पराग साने, मनीषा चव्हाण, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अंबिका कुलकर्णी, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव विश्वास माने, वकील संघटनेचे अध्यक्ष संदीप लवटे, जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, संघटनेचे सेक्रेटरी राजाराम यमगर, विक्रांत वडेर, आदी उपस्थित होते.