‘अभाविप’तर्फे शिराळ्यात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:32 AM2021-07-14T04:32:40+5:302021-07-14T04:32:40+5:30

शिराळा : सध्या पर्यावरण हा कळीचा मुद्दा बनला आहे. निसर्गात विपुल प्रमाणात ॲाक्सिजन गरजेचा आहे. यासाठी झाडे लावणे आणि ...

Tree planting in Shirala by ‘Abhavip’ | ‘अभाविप’तर्फे शिराळ्यात वृक्षारोपण

‘अभाविप’तर्फे शिराळ्यात वृक्षारोपण

Next

शिराळा : सध्या पर्यावरण हा कळीचा मुद्दा बनला आहे. निसर्गात विपुल प्रमाणात ॲाक्सिजन गरजेचा आहे. यासाठी झाडे लावणे आणि जगवणे महत्वाचे आहे. यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद येणाऱ्या एक वर्षात एक हजार झाडे लावण्याचा संकल्प केला असल्याचे श्रेयस महाजन यांनी सांगितले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ७३ वा वर्धापनदिन नुकताच झाला. यानिमित्ताने शिराळा येथे वृक्षारोपणाचे आयोजन केले होते. येथील न्यू इंग्लिश स्कूल ॲंड ज्युनिअर कॉलेज ॲाफ सायन्समध्ये कार्यक्रम पार पडला. मुख्याध्यापक अंगराज माजगावकर व परिषदेचे अरुण हाके यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले. यावेळी हेमंत नवांगुळ, केतन पाटील, स्वप्निल पाटील, केतन पाटील, संग्राम पाटील, प्रणव कदम, वरुण पटवर्धन, साहिल पाटील, पवन पाटील उपस्थित होते. नियोजन श्रेयस महाजन यानी केले.

Web Title: Tree planting in Shirala by ‘Abhavip’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.