पीएनजीतर्फे महापालिका क्षेत्रात वृक्ष संगोपन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:27 AM2021-04-27T04:27:14+5:302021-04-27T04:27:14+5:30
सांगली : सध्या देशभर चर्चा आहे ती ऑक्सिजनबाबतची. सजीवसृष्टीला निसर्गाने दिलेला ऑक्सिजन आणि तोही मोफत आहे; पण सातत्याने प्रदूषण ...
सांगली : सध्या देशभर चर्चा आहे ती ऑक्सिजनबाबतची. सजीवसृष्टीला निसर्गाने दिलेला ऑक्सिजन आणि तोही मोफत आहे; पण सातत्याने प्रदूषण वाढत आहे, शुद्ध हवा हे आपल्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. याकरिता अधिकाधिक वृक्षारोपण आणि त्याचे संगोपन होणे ही काळाची गरज आहे. यासाठी सर्वाननी पुढे येऊन खारीचा वाटा उचलायला हवा. सध्या सांगलीमध्ये अशा एका उपक्रमाची चर्चा आहे ती म्हणजे पीएनजीच्या सामाजिक बांधीलकीची.
एप्रिल-मे या महिन्यांमध्ये उन्हाची तीव्रता अधिक असते. महानगरपालिकेने लावलेल्या झाडांना महापालिकेच्यावतीने ठरावीक दिवसांनी झाडांना पाणी देऊन झाडे जगवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. झाडांना या उष्णतेच्या काळामध्ये पाण्याची अधिक गरज असते. ही बाब लक्षात घेऊन आमदार सुधीर गाडगीळ यांनी मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ या फर्मकडून वृक्ष संगोपनाचे काम गतवर्षीपासून सुरू केले आहे. यामध्ये आवश्यक त्याठिकाणी ट्रीगार्ड बसवणे, त्यांची देखभाल आणि पाणी देण्याचे काम सुरू आहे. रखरखत्या उन्हामध्ये झाडांना पीएनजीतर्फे पाणीपुरवठा केला जात आहे. छोट्या टँकरमधून दररोज विविध ठिकाणच्या झाडांना पाणी दिले जात आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.