शिराळ्यातील पुलावरील झाडे काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:32 AM2021-04-30T04:32:36+5:302021-04-30T04:32:36+5:30
शिराळा येथील पूल गल्ली रस्त्यावर असणाऱ्या पुलावरील अनावश्यक झाडे काढण्यात आली. विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : ...
शिराळा येथील पूल गल्ली रस्त्यावर असणाऱ्या पुलावरील अनावश्यक झाडे काढण्यात आली.
विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा येथील पूल गल्ली रस्त्यावर असणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाची दुरवस्था थांबवावी, तसेच नगरपंचायतीने दुरुस्ती करावी याबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध केली होती. यानंतर बुधवारी तातडीने या पुलावरील अनावश्यक झाडे काढण्यात आली.
बुधवारी मुख्याधिकारी योगेश पाटील, लक्ष्मण मलमे, दीपक पाटील यांनी या पुलाची पाहणी केली. पुलाच्या दोन्हीही बाजूला पिंपळाची मोठी झाडे बांधकामात आली आहे. यामुळे मूळ दगडी बांधकामास धोका उत्पन्न होत आहे. त्यामुळे ही सर्व झाडे काढून टाकण्यात आली. तसेच ही झाडे पुन्हा उगवू नयेत म्हणून दोन दिवसांत अॅसिड आदींचा वापर करून झाडे समूळ नष्ट करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
हा गावातील हा जाणारा मुख्य रस्ता आहे. वेळोवेळी रस्ते केल्याने भर पडून याची उंची वाढली आहे. यामुळे पुलाची रेलिंगची उंची कमी झाली असून, एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या पुलावरून मोठी वर्दळ असते. याबाबतही रेलिंगची उंची वाढविण्यासाठी, तसेच नुकताच नगरपंचायतने दक्षिण-उत्तर अशी दत्त मंदिराजवळ संरक्षण भिंत बांधली आहे. या ओढ्यातील माती, दगडे हे सर्व या भिंतीच्या भरावासाठी वापरल्यास ओढा स्वच्छ होईल. येणारा पावसाळ्याच्या आत हे ही काम लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असून, हे काम झाल्यास ओढा स्वच्छ होईल व पूर आल्यावर पाणीही लगेच निचरा होणार असल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले.