मिरज पूर्वमध्ये सेंद्रिय शेतीकडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:18 AM2021-01-01T04:18:17+5:302021-01-01T04:18:17+5:30
मिरज पूर्व भागातील लिंगनूर, बेळंकी, सलगरे, संतोषवाडी, खटाव, आरग परिसरात मागच्या पाच-सहा वर्षांमध्ये शेतीला म्हैसाळ योजनेमुळे मुबलक प्रमाणात पाणी ...
मिरज पूर्व भागातील लिंगनूर, बेळंकी, सलगरे, संतोषवाडी, खटाव, आरग परिसरात मागच्या पाच-सहा वर्षांमध्ये शेतीला म्हैसाळ योजनेमुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकरी मका, गहू, ज्वारी या पारंपरिक पिकांव्यतिरिक्त ऊस, द्राक्ष, भाजीपाला, फळबागा अशा जास्त उत्पादन देणारी पिके घेत असताना रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीचा पोत घसरून उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यातच विविध आजारांच्या भीतीने शेतकऱ्यांचा कल सेंद्रिय शेतीकडे आहे. त्यामुळे शेणखताची मागणी वाढली आहे. सध्या शेणखताच्या एका ट्रॉलीला पाच ते सहा हजार रुपये मोजावे लागत आहेत.
कोट
शेणखतापासून मातीचे कोणतेही नुकसान होत नाही
आवश्यक असणारे स्फुरद, पालाश, गंधक आदी घटक मिळतात.
नियमित वापरामुळे गांडूळ व सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते त्यामुळे मातीच्या रचनेत
बदल होऊन भौतिक बदल होतात. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची
क्षमता वाढते. पिकावर अळी, किडीचा प्रादुर्भाव होत नाही.
- सुरेश चौगुले, लिंगनूर शेतकरी