ट्राय कलर होंडाच्या टीमचा देशात द्वितीय क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:25 AM2021-03-25T04:25:44+5:302021-03-25T04:25:44+5:30
ही बातमी फोटोसह ८ बाय १० अशी घ्यावी सांगली : होंडा टू व्हीलर्स इंडियामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्किल काँटेस्टमध्ये सन ...
ही बातमी फोटोसह ८ बाय १० अशी घ्यावी
सांगली : होंडा टू व्हीलर्स इंडियामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्किल काँटेस्टमध्ये सन २०१९-२० च्या नॅशनल स्किल काँटेस्टमध्ये मिरज शहरातील ट्राय कलर होंडामधील टेक्निकल टीमने देशात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
ट्राय कलर होंडाच्या विजेत्या टीममध्ये, सुशील कोल्हे (सर्व्हिस ॲडव्हायझर), सुहास पाटील (सर्व्हिस सुपरवायझर), मीरासाहेब नदाफ (सर्व्हिस टेक्निशियन) यांनी सहभाग घेतला होता. सन २०१९-२० च्या स्किल काँटेस्टमध्ये देशातील ९९० होंडा डीलर्सनी सहभाग घेतला होता. यामधील एकूण १८,९१० टेक्निशियन, ६,४२५ सर्व्हिस ॲडव्हायझर व ३,४८२ सर्व्हिस सुपवायझरमधून यांची निवड झाली होती.
यासाठी होंडा टू व्हीलर्स इंडियामार्फत पश्चिम विभागाचे ट्रेनिंग इन्चार्ज संजय यादव व ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर किरण कुलकर्णी आणि विवेकानंद बंडगर, तसेच एरिया मॅनेजर मंदार जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ट्राय कलर होंडा मिरजचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित मगदूम यांचे सहकार्य लाभले.