गणपतराव देशमुख यांना ‘हुतात्मा’तर्फे श्रध्दांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:25 AM2021-08-01T04:25:08+5:302021-08-01T04:25:08+5:30
वाळवा : सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव (आबा) देशमुख यांच्या निधनानंतर वाळवा येथील हुतात्मा साखर कारखाना कार्यस्थळावर कामगारांच्यावतीने श्रध्दांजलीपर शोकसभा ...
वाळवा : सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव (आबा) देशमुख यांच्या निधनानंतर वाळवा येथील हुतात्मा साखर कारखाना कार्यस्थळावर कामगारांच्यावतीने श्रध्दांजलीपर शोकसभा घेण्यात आली.
यावेळी कामगार नेते, कारखान्याचे माहिती व जनसंपर्क अधिकारी शिवाजी पाटील म्हणाले, सांगोल्याचे विश्वविक्रमवीर आमदार गणपतराव आबा देशमुख हे शोषितांच्या चळवळीचे आधारस्तंभ होते. क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे एकनिष्ठ सहकारी होते. नागनाथअण्णांच्या निधनानंतर त्यांनी तेरा दुष्काळी तालुक्यांसाठीच्या आटपाडी पाणी परिषदेचे अध्यक्षपद तहयात भूषविले. नागनाथअण्णांच्या निधनानंतर त्यांनी हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या सुख-दु:खात प्रत्यक्ष सहभाग घेतला. वैभव नायकवडी यांना पुत्रवत आधार दिला. हुतात्मा साखर कारखाना व संकुलास या महान देशभक्ताची कमी नेहमीच जाणवत राहील.