वाळवा येथे हौसाताई पाटील यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:29 AM2021-09-26T04:29:28+5:302021-09-26T04:29:28+5:30
वाळवा : क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांच्या निधनाने हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचा आधारवड हरपला, असे मत हुतात्मा साखर कारखाना ...
वाळवा : क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांच्या निधनाने हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचा आधारवड हरपला, असे मत हुतात्मा साखर कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी व्यक्त केले. वाळवा येथे संचालक मंडळाच्या बैठकीत हाैसाताई पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
नायकवडी म्हणाले, प्रतिसरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध प्रतिसरकारच्या माध्यमातून लढा दिला. त्याच प्रतिकूल परिस्थितीमध्ये हौसाताई पाटील यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचे बाळकडू मिळाले. नाना पाटील व नागनाथअण्णा यांच्या प्रत्येक चळवळीत त्या सहभागी होत असत. त्यांच्या निधनाने आपण पोरके झालो आहोत.
यावेळी हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्या सर्व संस्थांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.