वनश्री नानासाहेब महाडिक यांना विविध भागातून आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:27 AM2021-05-12T04:27:46+5:302021-05-12T04:27:46+5:30
इस्लामपूर येथे वनश्री स्व. नानासाहेब महाडिक यांच्या प्रतिमेस उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. ...
इस्लामपूर येथे वनश्री स्व. नानासाहेब महाडिक यांच्या प्रतिमेस उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कार्यकारी संचालक महेश जोशी, सतीश महाडिक, आर. एम. बागडी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वनश्री स्व. नानासाहेब महाडिक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणनिमित्ताने वाळवा, शिराळा तालुक्यांसह जिल्ह्यात विविध ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
येलूर ग्रामपंचायत येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच बाळासाहेब जाधव, विनायक महाडिक, विजय पाटील, रणजित आडके, शशिकांत कुंभार उपस्थित होते. पेठ येथे पेठ ग्रामपंचायतमध्ये अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच चंद्रकांत पवार, आमिर ढगे, शंकर पाटील उपस्थित होते.
महाडिक शैक्षणिक संकुलात नानासाहेब महाडिक यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. जि. प. चे सभापती जगन्नाथ माळी म्हणाले, नानासाहेब महाडिक यांनी अनेकांचे नेतृत्व घडवले. अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेते केले. आजच्या या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये नानासाहेबांचे असणे खूप गरजेचे होते. नानासाहेबांच्या कार्याचा वारसा त्यांचे दोन्ही पुत्र राहुल आणि सम्राट पुढे चांगल्या पध्दतीने चालवत आहेत.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य निजाम मुलाणी, ज्येष्ठ नेते जयसिंगराव शिंदे, व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक महेश जोशी, जयकर कदम, गुलाब पाटील, अहिरवाडीचे माजी सरपंच राहुल कदम, बबन शिंदे, अरविंद माळी, सी. बी पाटील, राहुल चिटणीस, उदय पाटील, विलास पाटोळे, अशोक दिंडे उपस्थित होते.
महाडिक क्रेडिट सोसायटीमध्ये उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, संस्थेचे अध्यक्ष सतीश महाडिक, कार्यकारी संचालक आर. एम. बागडी, संचालक सुशील सावंत यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली.
दादासाहेब पाटील म्हणाले, अनेक फांद्यांना आधार देणारे नानासाहेब हे वटवृक्षासारखे होते. त्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे. इस्लामपूर शहराच्या जडणघडणीत नानासाहेबांचा फार मोठा वाटा होता. महाडिक मल्टिस्टेटच्या माध्यमातून नानासाहेबांनी अनेक युवकांना व्यवसायाकडे वळवले, अनेकांना आधार दिला.
इस्लामपूर नगरपरिषदेमध्ये अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक कपिल ओसवाल, नगरसेवक अमित ओसवाल, नगरसेवक चेतन शिंदे, गजानन फल्ले, सचिन सावंत, अॅड. फिरोज मगदूम, प्रवीण चिकुर्डेकर, सत्यवान रास्कर, इमरान फकिर उपस्थित होते.
यासह तालुक्यातील येलूर, नेर्ले, कुंडलवाडी, गोटखिंडी, भरतवाडी या ग्रामपंचायतींमध्ये अभिवादन करण्यात आले. शिराळा, कसबे डिग्रज, दुधगाव, समडोळी, वाळवा, बहे, किल्लेमछिंद्रगड, सागाव, बोरगाव, ताकारी, आष्टा, येडेनिपाणी, तांदुळवाडी, साखराळे, ऐतवडे बुद्रुक याठिकाणी प्रतिमा पूजन करण्यात आले.