बौद्ध महासभा व समता दलातर्फे वीर शिदनाक यांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:27 AM2021-01-03T04:27:10+5:302021-01-03T04:27:10+5:30
कळंबी येथे शौर्य परिषदेमध्ये समता दलाच्या सैनिकांनी वीर शिदनाक यांना मानवंदना दिली. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : बौद्ध महासभा ...
कळंबी येथे शौर्य परिषदेमध्ये समता दलाच्या सैनिकांनी वीर शिदनाक यांना मानवंदना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बौद्ध महासभा व समता सैनिक दलातर्फे सरसेनापती वीर शिदनाक यांना मानवंदना देण्यात आली. कळंबी (ता. मिरज ) येथे झालेल्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाभरातून समता दलाचे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१८१८ मध्ये भीमा-कोरेगावच्या लढाईत शिदनाक यांनी भीमपराक्रम गाजविला होता. त्याचे स्मरण म्हणून कळंबी येथे शिदनाक यांच्या स्मारक परिसरात शौर्य परिषद घेण्यात आली. विभागीय सचिव रूपेश तामगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दुपारी तीन वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. समता दलाच्या महिला आघाडीच्या अपर्णा वाघमारे, रतन तोडकर, शैलेश दंडवते, किरणकुमार कांबळे, यशवंत साबळे आदी उपस्थित होते. संयोजन मिलिंद इनामदार, प्रमोद इनामदार, अभिजित इनामदार एकादशी लोंढे आदींनी केले.
----------