तासगावात ‘तिरंगी’मुळे चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:16 PM2019-04-24T23:16:53+5:302019-04-24T23:16:58+5:30

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात गतवेळच्या तुलनेत यावेळी मतदानात २.३७ टक्क्यांनी घट झाली आहे. गतवेळी ७२.२२ टक्के मतदान झाले ...

Tripura in Tripura during the hour | तासगावात ‘तिरंगी’मुळे चुरस

तासगावात ‘तिरंगी’मुळे चुरस

Next

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात गतवेळच्या तुलनेत यावेळी मतदानात २.३७ टक्क्यांनी घट झाली आहे. गतवेळी ७२.२२ टक्के मतदान झाले होते. पण यंदा ६९.८५ टक्के मतदान झाले आहे. हा घटलेला टक्का कोणाला धक्का देणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. गतवेळी दुरंगी लढत आणि मोदी फॅक्टर दिसून आला होता. मात्र यावेळी मोदी फॅक्टरपेक्षा स्थानिक आणि जातीय समीकरणांचा प्रभाव दिसून आला.
मागील निवडणुकीत तासगाव-कवठेमहांकाळमध्ये मोठ्या अटीतटीने लढत झाली होती. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. खासदार पाटील यांना ३८ हजार १२८ मतांचे अधिक्य मिळाले होते.
यावेळी आर. आर. पाटील यांची पोकळी राष्टÑवादीला जाणवली. गत निवडणुकीत मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून खासदार पाटील यांनी होमपीचवर मताधिक्य मिळविण्यासाठी ताकद लावली होती. कार्यकर्त्यांची फळी त्यासाठी सुरुवातीपासूनच कामाला लावली होती. गेल्या पाच वर्षात राज्य आणि केंद्रातील नेत्यांना आणून वातावरण निर्मिती केली होती. कवठेमहांकाळ तालुक्यात गेल्या पाच वर्षात खासदार पाटील यांनी स्वत:चा गट तयार केल्याने, यावेळी या ठिकाणीही चांगली लढत देण्याचा प्रयत्न झाला.
याउलट राष्टÑवादीच्या गोटातील परिस्थिती होती. नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांचे काम करण्याचे आदेश दिले होते. विशाल पाटील यांची मदार राष्टÑवादीवरच होती. मात्र जातीय समीकरणांनी रंग भरल्यामुळे राष्टÑवादीत फाटाफूट झाल्याचे चित्र दिसून, काही समाजांची व्होट बँक गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी गेल्याचे चित्र होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील यांची प्रतिष्ठा, जातीय समीकरण यामुळे रंगतदार झालेल्या लढतीत मतांची झालेली फाटाफूट कोणाला मताधिक्क्य देऊन जाणार, याचा कौल निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

घोरपडेंची नाराजी दूर... तरीही उलट-सुलट चर्चा
माजी मंत्री अजितराव घोरपडेंचा पाच वर्षांपासूनचा दुरावा दूर करण्यात संजयकाकांना यश आले असले तरी, त्यांच्या गटाच्या एकसंध मतदानाबाबत उलटसुलट चर्चा आहे.

Web Title: Tripura in Tripura during the hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.