‘ट्रू व्होटर ॲप'ने उमेदवारांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:21 AM2021-01-14T04:21:59+5:302021-01-14T04:21:59+5:30
जत : ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना ‘ट्रू व्होटर ॲप' डाउनलोड करून त्यात माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले ...
जत : ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना ‘ट्रू व्होटर ॲप' डाउनलोड करून त्यात माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक पारदर्शीपणे पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने हे आदेश जारी केले आहेत.
उमेदवारांनी माहिती व दैनंदिन खर्च दररोज या ॲपमध्ये ऑनलाइन भरावयाचा आहे.
निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आयोगाने घातलेल्या बंधनांमुळे उमेदवारांना वेळेचे नियोजन करताना दमछाक होत आहे. नवीन नियमामुळे उमेदवारांना ऑफलाईन व ऑनलाईन माहिती देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी बूथ तयार करण्यात आले आहेत. मतदारांच्या संख्येनुसार त्यांची रचना करण्यात आली आहे. या ॲपमध्ये संबंधित मतदान बूथचे मॅपिंग केले जाणार आहे. त्यात मतदान बूथचे अक्षांश, रेखांश येणार आहेत. त्यामुळे त्याची माहिती निवडणूक आयोगाला त्याच वेळी कळणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक पारदर्शीपणे पार पडावी, यासाठी ही कार्यवाही करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांनी ‘ट्रू व्होटर ॲप' डाउनलोड करावे, अशा निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत.