प्रेमीयुगुलांना छेडणाऱ्या गुंडास चाकणमध्ये ठेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:08 AM2018-05-14T00:08:50+5:302018-05-14T00:08:50+5:30

The trunk of the lover was trampled in the chakan | प्रेमीयुगुलांना छेडणाऱ्या गुंडास चाकणमध्ये ठेचले

प्रेमीयुगुलांना छेडणाऱ्या गुंडास चाकणमध्ये ठेचले

Next


सांगली : रेठरेधरण (ता. वाळवा) येथील गुंड भावश्या पाटील याने चाकण (जि. पुणे) येथे प्रेमीयुगुलांना छेडणाºया एका गुंडाचा खून केल्याची कबुली दिली आहे. २०११ मध्ये चाकणमध्ये निर्जनस्थळी त्याने या गुंडाचा दगडाने ठेचून खून केला आहे. खून केल्यानंतर त्याने या मृत गुंडाचे रिव्हॉल्व्हर पळविल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे. खुनाच्या तपासासाठी गुंडाविरोधी पथक चाकणला रवाना झाले आहे.
बारा वर्षांत गुंड भावश्या पाटील याने चार खून, तीन खुनाच्या प्रयत्नांसह चोरीच्या गुन्ह्यांची मालिकाच रचली. आठ वर्षापूर्वी तो इस्लामपूर न्यायालयाच्या आवारातून पोलिसांना हिसडा मारुन पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी जंग-जंग पछाडले, पण सुगावा लागत नव्हता. आठ वर्षाच्या फरारी काळात त्याने रेठरेधरणमधील संताजी पाटील-खंडागळे यांचा घरात घुसून खून केला होता. त्यामुळे पुन्हा पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष मोहीम राबविली. दोन दिवसापूर्वी त्याला पंढरपुरात जेरबंद करण्यात यश आले होते. सध्या तो चौदा दिवस पोलीस कोठडीत राहणार असल्याने त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. इस्लामपूर व गुंडाविरोधी पथक संयुक्तपणे हा तपास करीत आहेत.
इस्लामपूर न्यायालयाच्या आवारातून भावश्याने १८ आॅक्टोबर २०१० रोजी पलायन केले होते. त्यानंतर तो थेट पुण्याला गेला. तिथे तो केटरिंगचा व्यवसाय करीत होता. चाकण परिसरात त्याची उठ-बस असायची. चाकणमधील निर्जनस्थळी प्रेमीयुगुले बसण्यासाठी येतात. तेथे एक गुंड युगुलांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लुटायचा. भावश्याने हा प्रकार तीन-चार वेळा पाहिला. यातून त्याने या गुंडाशी ओळख केली. त्यानंतर चाकणमध्येच निर्जनस्थळी नेऊन त्याचा दगडाने ठेचून खून केला. २०११ मध्ये ही घटना घडली आहे. त्यावेळी या गुंडाचे रिव्हॉल्व्हरही पळविले. हेच रिव्हॉल्व्हर संताजी खंडागळे यांचा खून केल्यानंतर दहशत माजविण्यासाठी वापरले होते. हवेत गोळीबार करीत ‘भावश्या, भावश्या’, असे म्हणत तो त्यावेळी पळला होता.
आठ वर्षांपूर्वी केलेल्या खुनाची भावश्याने कबुली दिली असली तरी, मृत झालेला गुंड कोण? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यावेळी चाकण पोलिसांना मृतदेह सापडला होता का? सापडला असेल तर त्याची ओळख पटली होती का? ओळख पटली नसेल तर पोलिसांनी मृतदेहाची छायाचित्रे काढून तो दफन केला असण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा उलगडा करण्यासाठी गुंडाविरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक संजय डोके चाकणला रवाना झाले आहेत. तेथील पोलिसांच्या मदतीने या खुनाचा तपास केला जाणार आहे.
रिव्हॉल्व्हरचा शोध घेणार
चाकणमध्ये २०११ मध्ये खून केला, असे भावश्या सांगत आहे. खून केल्यानंतर पळविलेल्या रिव्हॉल्व्हरचा वापर त्याने तब्बल पाच वर्षांनंतर २०१६ मध्ये संताजी पाटील-खंडागळे यांच्या खुनावेळी केला. एवढी वर्षे त्याने हे रिव्हॉल्व्हर कुठे ठेवले? त्याचा आणखी कुठे वापर केला का? याचा तपास केला जाणार आहे. पंढरपुरात तो राहत असलेल्या खोलीची झडती घेतल्यानंतर केवळ धार्मिक पुस्तके सापडली. रिव्हॉल्व्हर सापडलेच नाही.

Web Title: The trunk of the lover was trampled in the chakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.