विद्यापीठ उपकेंद्रासाठी राजकारण विरहित प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:19 AM2021-07-20T04:19:16+5:302021-07-20T04:19:16+5:30
विद्यापीठ उपकेंद्राबाबत खानापूर येथील राममंदिरामध्ये आयोजित केलेल्या ‘घोंगडी बैठकीत’ ते बोलत होते. आमदार पडळकर म्हणाले, खानापूर सर्वांना मध्यवर्ती असणारे ...
विद्यापीठ उपकेंद्राबाबत खानापूर येथील राममंदिरामध्ये आयोजित केलेल्या ‘घोंगडी बैठकीत’ ते बोलत होते.
आमदार पडळकर म्हणाले, खानापूर सर्वांना मध्यवर्ती असणारे व सोयीचे ठिकाण आहे. नियोजित विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच व्हावे. यासाठी राज्यपालांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली आहे. राज्यपालांनीही याबाबत सकारात्मकता दाखवून लवकरच निर्णय घेऊ, असे सांगितले आहे.
यामुळे उपकेंद्र खानापूर मध्येच होणार आहे. यासाठी सर्वांनी पाठपुरावा केला पाहिजे. यासाठी खानापूर तालुक्यातील तरुणांच्या सोबत मी असणार आहे.
भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास पाटील यांनी, सन २०१३ मध्ये विद्यापीठाकडून उपकेंद्रासाठी खानापूरला मंजुरी मिळाली आहे. यामुळे उपकेंद्र खानापूरलाच होण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली लढण्यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे.
अक्षय भगत, ऋषिकेश देसाई, विठ्ठल भगत, स्वप्नील मंडले, जे. पी. टिंगरे, विकास देसाई, इसाक पीरजादे यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस सुजित कदम, विक्रम भिंगारदेवे, दीपक खराडे, गजानन भगत, अमीर पिरजादे, रईस पिरजादे, सतीश खाडे, अतुल कुलकर्णी, युवराज भगत, सागर हजारे, सचिन ठोंबरे, योगेश कोळी उपस्थित होते.