अतिदक्षता विभागातच तंत्र मंत्राद्वारे रुग्णावर उपचाराचा प्रयत्न, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार -video

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 11:35 AM2022-12-22T11:35:25+5:302022-12-22T11:59:27+5:30

या प्रकाराला डॉक्टरांनी विरोध केला असता त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न

Trying to treat the patient through tantra mantra in the hospital itself, Shocking type in Sangli district | अतिदक्षता विभागातच तंत्र मंत्राद्वारे रुग्णावर उपचाराचा प्रयत्न, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार -video

अतिदक्षता विभागातच तंत्र मंत्राद्वारे रुग्णावर उपचाराचा प्रयत्न, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार -video

Next

आटपाडी : आटपाडी शहरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल असणाऱ्या अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी मंत्र तंत्र म्हणत अवैधरीत्या जादूटोणा करून उपचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराला डॉक्टरांनी विरोध केला असता त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान या प्रकाराबाबात संपतराव नामदेव धनवडे (वय ४३, रा.आटपाडी) यांनी आटपाडी पोलिसात निवेदन देत तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, आटपाडी गावात बेकायदेशीर अंधश्रद्धा पसरवून धर्म परिवर्तन करण्याचे काम काही समाज विधायक व्यक्तीकडून जाणून-बुजून सुरू आहे. याबाबत काल, बुधवारचे (दि २१) वरद हॉस्पिटल आटपाडी येथील सीसीटीव्ही फुटेजचे व्हिडिओ प्राप्त झाले आहे. यात संबंधित व्यक्ती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एका रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून तंत्र मंत्राच्या आधारे भोंदूगिरी करताना दिसत आहे.

याप्रकारास वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य रावण यांनी विरोध केला असता संबंधिताने हुज्जत घातली. सदर प्रकार करणारे आणि धर्मांतरण आपल्यावरील कृतीतून खतपाणी घालणारे आटपाडीतील संजय गेळे व त्यांच्या पत्नी अश्विनी गेळे या व्हिडिओ चित्रीकरणांमध्ये स्पष्ट दिसत आहेत. बेकायदेशीररित्या अंधश्रद्धा पसरवून व रुग्णांच्या असह्यतेचा गैरफायदा घेत धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडणाऱ्या गेळे दाम्पत्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी धनवडे यांनी केली आहे.

Web Title: Trying to treat the patient through tantra mantra in the hospital itself, Shocking type in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.